Madhukarrao Chavan : धोतर, शुभ्र सदरा..! 5 वेळा आमदार, एकदा मंत्री राहिलेले 87 वर्षीय अण्णा विधानभवनात, आधार न घेता पायऱ्या उतरले

Madhukarrao Chavan at Vidhan Bhavan : 25 वर्षे आमदार, एकदा कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव चव्हाण हे गुरुवारी विधानभवनात आले होते. जुन्या पिढीतील राजकीय नेत्यांचे प्रतिनिधी असलेल्या 87 वर्षीय मधुकररावांना कोणाचाही आधार न घेता पायऱ्या उतरताना पाहणे हा नव्या पिढीच्या राजकारण्यांसाठी एक वेगळाच अनुभव होता.
Madhukarrao Chavan at Vidhan Bhavan
Madhukarrao Chavan at Vidhan BhavanSarkarnama
Published on
Updated on

Senior Congress leader and Former minister Madhukarrao Chavan : पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू सदरा.... हल्ली राजकारणातून लोप पावत चाललेला हा पेहेराव गुरुवारी विधानभवनात पाहायला मिळाला, तो माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यामुळे. वयाच्या 87 व्या वर्षात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण गुरुवारी विधानभवनात आले होते. या वयातही कोणाचाही आधार न घेता पायऱ्या उतरत असलेल्या मधुकररावांना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

अण्णा या टोपणनावाने ओळखले जाणारे मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मधुकरराव चव्हाण(Madhukarrao Chavan) यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मधुकरराव चव्हाण यांच्याविषयीही संशयाचे धुके दाटले होते. त्याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याशी चव्हाण यांची सोलापुरात भेट झाली होती. त्या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली होती. त्यामुळे संशय आणखी बळावला होता.

मात्र आपण काँग्रेससोबतच आहोत, असे स्पष्ट करून ते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. त्यानंतर हा संशय दूर झाला होता. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून राजेनिंबाळकर विजयी झाले. चव्हाण यांच्या अणदूर (ता. तुळजापूर) गावातून त्यांना आघाडी मिळाली.

Madhukarrao Chavan at Vidhan Bhavan
Manisha Kayande News : भावना गवळींमुळे विधान परिषदेची पुन्हा संधी हुकलेल्या कायंदेंच्या पुनर्वसनासाठी आता शिंदे काय डाव टाकणार ?

मधुकरराव चव्हाण हे 1999 ते 2014 दरम्यान सलग चारवेळा तुळजापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. 1990 ते 1995 दरम्यानही ते आमदार होते. 1995 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माणिकराव खपले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी एकदा चव्हाण यांनी उस्मानाबाद (धाराशिव) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील(Ranajgajit Singh Patil) यांच्याकडून ते पराभूत झाले होते. काँग्रेसचे सरकार असताना चव्हाण हे कॅबिनेटमंत्री होते. त्यापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्ये अध्यक्षपद त्यांनी दोनवेळा भूषवले आहे.

2019 च्या निवडणुकीवेळी चव्हाण यांचे वय 82 वर्षे होते. त्या वयातही त्यांनी जोमाने प्रचार केला होता. त्या निवडणुकीतील ते राज्यातील सर्वात ज्येष्ठ उमेदवार होते. समोर राणाजगजितसिंह पाटील हे तरुण उमेदवार असतानाही चव्हाण यांनी त्यांच्या तोडीस तोड प्रचार केला होता. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून चव्हाण यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. त्यानंतर लोकल बोर्डाचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

पांढरे शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा त्यांचा उठून दिसणारा पेहेराव असतो. गुरुवारी विधानभवनात आले त्यावेळीही त्यांचा पेहेराव असाच होता. आता धोतर घालणारे फार कमी राजकीय नेते राज्यात आहेत. फुलंब्रीचे आमदार, माजी मंत्री हरीभाऊ बागडे उर्फ नाना (Haribhau Bagde) हेही धोतर वापरतात.

Madhukarrao Chavan at Vidhan Bhavan
MLC Election 2024 : सत्तेत असलेल्या 'मविआ'ला फडणवीसांनी लावला होता सुरुंग, आतातर भाजप सत्तेत आहे..!

मधुकरराव चव्हाण यांनी तरुणपणात कुस्त्यांचे आखाडेही गाजवले आहेत. त्यासाठी त्यांनी तालमीत व्यायाम करून शरीरयष्टी कमावली. दूध, घरच्या सकस आहारालाच त्यांची पसंती असते. राजकारणात सक्रिय असताना दररोज सकाळी सहा वाजता त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. निवडणूक नसली तरी ते दररोज किमान काही गावांना तरी भेटी द्यायचे.

लोकांमध्ये सहज मिसळणे, लोकांसोबत अगदी जमिनीवर बसून गप्पा मारणे, ही त्यांची खासियत राहिली आहे. आमदार, मंत्री असताना तुळजापूर मतदारसंघात त्यांनी सिंचनाची भरपूर कामे केली आहेत. 87 वर्षीय मधुकरराव चव्हाण गुरुवारी विधानभवनात कोणाचाही आधार न घेता पायऱ्या उतरत होते. यावरून तरुण पिढीतल्या राजकीय नेत्यांनी व्यायामाचे, सकस आहाराचे महत्व लक्षात घेतले पाहिजे.

लोकांत, चारचौघांत सहजपणे मिसळणे हा जुन्या राजकीय नेत्यांचा स्थायीभाव होता. चव्हाण हे त्या पिढीतील राजकीय नेत्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा पेहेरावही त्याला पूरक असाच असतो. आताच्या तरुण पिढीतील नेतेही लोकांत मिसळतात, मात्र त्यांची ती कृती राजकीय गरजेपोटीची असते. वयोमानामुळे ते आता राजकारणात पूर्वीइतके सक्रिय नाहीत. त्यांचे नातू अभिजित चव्हाण हे युवक काँग्रेसचे प्रदेश सरटिचणीस आहेत. निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी हे पद मिळवले आहे. नातू अभिजित यांच्या रूपाने आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com