Vikram Kakade News: 'अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा..'; आमदार विक्रम काकडेंची अमित शाह यांच्याकडे मागणी

NCP MLA Vikram Kakde: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
Vikram Kakde Amit Shah Meeting Ajit Pawar .jpg
Vikram Kakde Amit Shah Meeting Ajit Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याबरोबरच अजित पवार यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्वपूर्ण विभागांत अमूल्य योगदान दिले आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याणकारी उपक्रम व प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे कायमच ते चर्चेत राहिले. याच कारणास्तव त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.

अजित पवार यांचे कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरील भेटीदरम्यान केली आहे. या मागणीचे निवेदनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना दिले आहे.

Vikram Kakde Amit Shah Meeting Ajit Pawar .jpg
Jay Pawar: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवरुन जय पवारांचा काँग्रेसवर निशाणा; इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

अजित पवार यांचे यावर्षी जानेवारी महिन्यात विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या निधनाने हळहळला होता. कामाचा माणूस आणि रोखठोक नेता म्हणून अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती.

पुणे विधान परिषद मतदारसंघातून महायुतीकडून ऐनवेळी पक्षप्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com