भाजपचं “संबंधित पात्र” बरळलं ; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

जेव्हा-जेव्हा या भूमीवर कूणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कूणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार ! ऐका, आम्ही न कधी मुघलांशी घाबरलो न कधी जिन्नावादियांशी मग तुम्हाला काय खाक घाबरणार?’
Sambit Patra, Rupali Patil Thombre

Sambit Patra, Rupali Patil Thombre

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त टि्वट केले आहे. पात्रा यांनी मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी संबित पात्रा यांच्यावर निशाणा साधला आहे.

एमआयएमआयचे नेते असुद्दिन ओवेसी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संबित पात्रा (Sambit Patra) आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, ''कुणाला धमकावत आहात मियां ? लक्षात ठेवा जेव्हा-जेव्हा या भूमीवर कूणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कूणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार ! ऐका, आम्ही न कधी मुघलांशी घाबरलो न कधी जिन्नावादियांशी मग तुम्हाला काय खाक घाबरणार?’

कर्नाटक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानतर आता भाजप नेते संबित पात्रा यांनी हे टि्वट करीत नवीन वाद निर्माण केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी संबित पात्रा यांच्यावर टीका केली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''भाजप “संबंधित पात्र” बरळलं, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा शिवद्रोह उघडा पडत आहे. कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटणाऱ्यांनो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है”.

<div class="paragraphs"><p>Sambit Patra, Rupali Patil Thombre</p></div>
भाजप आमदारांच्या काकांच्या शेतातून धान्य साठा जप्त ; राष्ट्रवादीची तक्रार

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी अधिवेशनात गोंधळ घातला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला होता. भास्कर जाधव यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी टि्वट करीत फडणवीसांना चांगलेच सुनावले. आपल्या टि्वटमध्ये रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात, ''कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले’, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे? महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे,''

<div class="paragraphs"><p>Sambit Patra, Rupali Patil Thombre</p></div>
विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com