

Someshwar Factory Election : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात लढत होईल असे चित्र होते. मात्र अचानक आमदार विजय शिवतारे यांनी शिवसेनाही ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पण सोमेश्वरमध्ये शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. शिवाय विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनीही आपले स्वतंत्र पॅनल जाहीर केल्याने आता ही लढत तिरंगी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 21 उमेदवार जाहीर केले आहेत.
शिवसेनेकडून सोमेश्वरची निवडणूक लढण्याची घोषणा आमदार शिवतारे यांनी केली होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत युती केली.
विद्यामान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल जाहीर केले आहे. मात्र, त्यांना भाजपचा पाठींबा आहे. भाजप नेते, माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेत पुरुषोत्तम जगताप यांनी निवडणुकीचे बिगुल फुंकले. दरम्यान, जगताप यांच्याशी चर्चेचे प्रयत्न झाले, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पुरुषोत्तम जगताप यांची समजूत घालण्यासाठी पाठवले. मात्र, त्यांनाही यामध्ये अपयश आले. यानंतर संजय जगताप वाणेवाडी येथे दाखल झाले आणि त्यांनीही बंद दाराआड चर्चा केल्या. यानंतर पुरुषोत्तम जगताप व संजय जगताप यांनी पक्षविरहित अजितदादा शेतकरी विकास पॅनेल स्थापन केल्याचे जाहीर केले आणि नाट्यमयतेचा कळस गाठला. यानंतर घड्याळ व तुतारी यांनीही आपला पॅनेल जाहीर केला.
शरद पवारांच्या निवास्थानी बैठक झाल्याने दो्न्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. मात्र, जागावाटपावरून मेळ न बसल्याने बोलणी फिसकटल्याचे माहिती आहे.दरम्यान, मंगळवारी दोन्ही गटांनी आपापल्या स्वतंत्र उमेदवारी याद्या जाहीर केल्या नाहीत. किमानपक्षी बुधवारी सकाळी याद्या जाहीर होतील, अशी सभासदांना खात्री होती. मात्र, अखेर दोन्ही राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.