Mumbai model Pune post : मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यातही 'या' पदाची निर्मिती करावी; मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे साकडे

Congress appeal to Chief Minister News : पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत बैठक घेऊन घोषणा केल्या.
Devendra Fadnavis On Congress News
Devendra Fadnavis On Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस खात्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) पद निर्माण करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने करणे गरजेचे आहे. पण, ती नेमणूक करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब मुहूर्त कधी लागणार? अशी विचारणा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत बैठक घेऊन घोषणा केल्या. या घोषणांची पूर्तता होण्यासाठी आणखी पंचवीस, तीस वर्षे लागणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis On Congress News
BJP MLA : भाजप आमदाराला ड्रायव्हिंगची भलतीच हौस, यापूर्वी घाटात ट्रक आणि आत्ता एसटी बसही चालवली

मुंबईच्या धर्तीवर पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) नेमावे, या पदावरील व्यक्तीला प्रशासकीय अधिकारी अधिक असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करता येते. याकरिता तीन वर्षांपासून काँग्रेस (Congress) पक्ष मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे मागणी करीत आहे. ही मागणी मान्य करून कार्यवाही करावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

Devendra Fadnavis On Congress News
BJP Vs Shivsena : प्रभाग रचनेत फिक्सिंग : भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेची तक्रार

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी, या विषयाला काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. मेट्रो रेल योजना काँग्रेसने आणली, बीआरटी मार्ग सुरु केला आहे. बीआरटी मार्गाची गरज मुख्यमंत्र्यांना आता वाटू लागली पण त्यांच्याच भाजपने (BJP) विरोध करून योजना हाणून पाडायचा प्रयत्न केला होता.

Devendra Fadnavis On Congress News
BJP MLA : भाजप आमदाराला ड्रायव्हिंगची भलतीच हौस, यापूर्वी घाटात ट्रक आणि आत्ता एसटी बसही चालवली

मेट्रो कामाला तीन वर्षांचा विलंब भाजप नेत्यांमधील वादामुळे झाला, असेही मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे जोशी यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis On Congress News
Eknath Shinde setback : मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेंना मोठा धक्का; लाडक्या आमदाराच्या जवळच्या नेत्याने केली भाजपमध्ये एंट्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com