Eknath Shinde setback : मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेंना मोठा धक्का; लाडक्या आमदाराच्या जवळच्या नेत्याने केली भाजपमध्ये एंट्री

BJP joining News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठे प्रवेश होत आहेत. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघडी एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळ अजमावणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे हिंदी सक्त्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. त्यामुळे मनसे व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला असून मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वें यांच्या जवळच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेंचे टेन्शन वाढले आहे.

निवडणूक आयोगाकडून दिवाळी झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतुन काही दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या जोरात आऊटगोइंग सुरू आहे. त्यातच आता भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत चिंतेचे वातावरण आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP Politic's : जगदीप धनखड, मलिक यांची बाजू घेणे भाजप नेत्याला पडले महागात; पक्षातून झाली हकालपट्टी

मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष येरुणकर हे वार्ड क्रमांक आकाराचे शिवसेना शाखाप्रमुख आहेत, त्यांनी आज शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सुभाष येरुणकर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेत (Shivsena) होते, पण आज त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Satej Patil tractor GPS opposition : देशातील ट्रॅक्टरला लागणार जीपीएस, ब्लॅक बॉक्स; कोल्हापुरातून सतेज पाटलांनी विरोध करत फोडले बिंग

मुंबई महापालिका निवडणूक भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे व काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे हे पाच पक्ष समोरासमोर येत असल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
NCP News : धाराशीव राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर ? अजित पवार भाकरी फिरवणार? की जुनाच चेहरा देणार..

सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. सुभाष येरुणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pune Municipal Elections : ठरलं तर, आगामी पुणे महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार; पक्षश्रेष्ठींच्या सूचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com