Parth Pawar Controversy: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात खुद्द अजित पवारांनीच लावली चौकशी? म्हणाले, मुख्यमंत्र्यांना...

Parth Pawar Controversy: कोणीही माझ्या जवळचा नातेवाईक असो किंवा कोणीही माझ्या नावाचा वापर करुन कोणीही काही केलेलं असेल तर अधिकाऱ्यांनी सरळ त्या प्रकरणांमध्ये कारवाई करावी, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on
Updated on

Parth Pawar Controversy: पुण्यातील कोरेगाव पार्क कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनीच लावली असल्याचं स्वतः पवारांनी दिलेल्या निवेदनातून समोर आलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याप्रकरणावर सविस्तर भाष्य केलं, आपणंच मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
BMC Election: BMC निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा डाव; आमदाराचं विधान चर्चेत!

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, "या व्यवहाराची मी माहिती घेतली तसंच याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते, त्यावेळी मी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. तसंच मी त्यांना सांगितलं की, जरी माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित हा विषय असला तरीही तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, त्यामुळं तुम्हाला जे काही नियमाप्रमाणं करावं लागेल, याची चौकशी करावी लागली, तुम्हाला जर चौकशी समिती नेमायची असेल, जे काही करायचं असेल तर ते करु शकता. कारण एवढ्या मोठ्या राज्याचं तुम्ही नेतृत्व करता ते करत आहात, त्यामुळं माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील.

Ajit Pawar
Vande Mataram: वंदे मातरम् वरुन राजकीय घमासान, काँग्रेसचा मोठा दावा! भाजप-RSS च्या शाखांमध्ये...

शेवटी आरोप करणं सोपं असतं पण त्याची वस्तुस्थिती काय आहे? हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. याची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, या व्यवहारात १ रुपयाही दिला गेला नाही. तरीही यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी, आकडे सांगितले गेले आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण मला आज संध्याकाळी माहिती कळाली की या व्यवहारात जो काही व्यवहार झालेला होता तो रद्द झालेला आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Ajit Pawar
Android smartphone : सावधान! अँड्रॉईड स्मार्टफोन वापरताय, मग सरकारने दिलेला हा इशारा वाचाच...

जवळच्या नातेवाईकांचीही चौकशी करा - अजित पवार

अजित पवार पुढे म्हणाले, "मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना संबंधित 'क्लास वन-क्लास टू आयएएस आयपीएस अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना मला सूचना करायची आहे की, इथून पुढेही कुठल्याही प्रकारचं प्रकरण तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरुन नसेल तर दबावाखाली न येता सरळ त्याला काट मारायची. कोणीही माझ्या जवळचा नातेवाईक असो किंवा कोणीही माझ्या नावाचा वापर करुन कोणीही काही केलेलं असेल तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही.

Ajit Pawar
Karuna Munde : जो विरोधात जाईल त्याच्याविरुद्ध कट कारस्थान हा धनंजय मुंडेचा धंदाच! करुणा शर्मांचाही आरोप

तसंच मीडियानं दोन दिवस या प्रकरणाच्या सर्व गोष्टी चालवल्या, ही माहिती त्यांना मिळालेली होती शेवटी माध्यमांचं कामच आहे जे आहे ते दाखवणं. तसंच बारामतीमध्ये देखील असे काही प्रकार घडल्याचंही माध्यमांनी दाखवलं, माझं म्हणणं आहे की, ज्यांच्याकडं अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com