BMC Election: BMC निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा डाव; आमदाराचं विधान चर्चेत!

BMC Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोगानं नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Srakarnama
Published on
Updated on

BMC Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोगानं नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या निवडणूक जाहीर होतील त्यानंतर शेवटी महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यातच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा देखील समावेश असेल, याला अद्याप दीड एक महिन्याचा अवकाश असला तरी मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? याबाबत राजकीय पक्षांकडून दावे केले जात आहेत. त्यातच काँग्रेसच्या एका आमदारानं मुंबईचा महापौर हा काँग्रेसचाच असेल असं विधान केलं आहे. तसंच या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेसोबत आघाडीबाबतही या आमदारानं भाष्य केलं आहे.

Mumbai Municipal Corporation
Vande Mataram: वंदे मातरम् वरुन राजकीय घमासान, काँग्रेसचा मोठा दावा! भाजप-RSS च्या शाखांमध्ये...

मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होणार असं विधान मालाडचे काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं मुंबई महाविकास आघाडीचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं नेत्यांकडून बोललं जात असतानाच अस्लम शेख यांनी इतर दोन पक्षांसोबत निवडणूक लढणार नसल्याबाबतचे संकेत दिले आहेत. तसंच शिवसेना आणि मनसेसोबत मुंबईत युती करायची की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai Municipal Corporation
NCP Election Strategy Meeting : राष्ट्रवादीच्या निवडणूक स्ट्रॅटेजी मिटिंगला रामराजेंची दांडी; मकरंद पाटलांच्या हाती साताऱ्याचे स्टेअरिंग!

मतदार याद्यांबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले, "मतदार याद्या चुकीच्या आहेत, हे मी आणि राहुल गांधी दोघेही सुरुवातीपासून सांगत आहोत. मतदार याद्यांमध्ये डुप्लिकेट नावे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. आशिष शेलार यांनी सुद्धा सांगितलं की, मालाडमध्ये 17 हजार डुप्लिकेट नावे आहेत. प्रत्येक मतदार यादीमध्ये चुका आहेत आणि त्या चुका इलेक्शन कमिशनमुळे झाल्या आहेत. एका व्यक्तीचे तीन-तीन किंवा चार-चार नावे विविध याद्यांमध्ये दिसत आहेत. माझे स्वतःचे नावही दोन वेगवेगळ्या याद्यांमध्ये आढळले आहे, हे काढण्याची जबाबदारी कोणाची? असा सवालही त्यांनी केला आहे.

Mumbai Municipal Corporation
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? मंत्री बावनकुळेंनी सांगितली टेक्निकल गोष्ट

दरम्यान, भाजपच्या 'वंदे मातरम' कार्यक्रमावर बोलताना अस्लम शेख म्हणाले, भाजप नेते माझ्या कार्यालयासमोर कशाला कार्यक्रम घेत आहेत, त्यापेक्षा त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन 'वंदे मातरम्' गायनाचा कार्यक्रम घ्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com