गँगस्टरच्या पत्नीचा भाजप प्रवेश? : चंद्रकांत पाटील म्हणतात...

पाटील यांच्या आमदारकीला दोन वर्षे पूर्ण
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा याबाबतचा निर्णय कुणी एकटा घेत नाही. पक्षाची नऊ जणांची ‘कोअर टीम’ याबाबत निर्णय घेते, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ व गुंड संतोष लांडे याच्या पत्नी गायत्री लांडे यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. या संदर्भाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर पाटील बोलत होते.

पाटील यांच्या आमदारकीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाटील यांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात स्वाती मोहोळ व गायत्री लांडे यांनी पाटील यांचा सत्कार केला. महापालिका निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर मोहोळ व लांडे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शक्तीप्रदर्शन केल्याचे सांगण्यात येते. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला पाटील यांनी उत्तरे दिली.

चंद्रकांत पाटील
पुण्यात नवीन कोरोना रूग्णांच्या दीडपट कोरोनामुक्त

पाटील म्हणाले, ‘‘ माझ्या मतदारसंघातला कार्यक्रम होता. मात्र, त्यात राजकीय काहीही नव्हते.कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. त्यांनी कुणी यावे यासाठी पास वाटक करण्यात आले नव्हते.कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील लोक आले होते. मुळात मोहोळ किंवा लांडे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत चर्चा झालेली नाही. निवडणुका अजून खूप लांब आहेत.अजून प्रभाग रचना व्हायची आहे. त्यामुळे केवळ चर्चा करण्यात अर्थ नाही.’’

चंद्रकांत पाटील
चित्रा वाघ म्हणाल्या; तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला !

कार्यक्रमस्थळी येऊन या दोघांनी मोठे शक्तीप्रदर्शन केल्यासंदर्भात विचारले असता या संदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा असे उत्तर पाटील यांनी दिले. मुळात ज्या झाडाला आंबे असतात. त्याच झाडाला लोक दगड मारतात, असे उत्तर पाटील यांनी दिले. मोहोळ व लांडे यांना पक्षात प्रवेश देणार की नाही, याबाबत पाटील यांनी थेट कोणतेच उत्तर दिले नाही.

E

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com