Baramati Politic's : बारामतीत पवार काका-पुतणे पुन्हा आमने सामने; ‘माळेगाव’च्या निवडणुकीत चौरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तडजोड होईल, अशी चर्चा रंगली होती. तशा बैठकाही झाल्या. पण तडजोडीला यश आले नाही, त्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली आहे.
Sharad Pawar-Ranjan Taware-chandrarao Taware-Ajit Pawar
Sharad Pawar-Ranjan Taware-chandrarao Taware-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Malegaon, 13 June : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या इतिहासात यंदा प्रथमच चौरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका-पुतणे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत. माळेगाव कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीळकंठेश्वर, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचा बळिराजा सहकार बचाव, पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती व अपक्षांचा एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून आपल्या नीळकंठेश्वर पॅनेलकडून विद्यमान सात संचालकांना, तर माजी पाच संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे, त्यामुळे ‘माळेगाव’च्या निमित्ताने बारामतीचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Malegaon Sugar Factory elections) गुरुवारी (ता. 12 जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, या माघारीच्या दिवसापर्यंत मातब्बरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने तडजोडीला यश येऊ शकले नाही. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीच्या रिंगणात चार पॅनेल उतरले आहेत.

माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तडजोड होईल, अशी चर्चा रंगली होती. संबंधित नेत्यांमध्ये तडजोडीसाठी बैठकही झाल्या होत्या, त्यासाठी अजित पवार यांच्या वतीने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, किरण गुजर, राजवर्धन शिंदे, ॲड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते आदी नेते प्रयत्न करत होते.

Sharad Pawar-Ranjan Taware-chandrarao Taware-Ajit Pawar
Solapur NCP SP : पवारांचा सोलापूरसाठी मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी मोहिते पाटलांच्या कट्टर समर्थकाची वर्णी

विरोधकांकडून चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी संबंधितांबरोबर चर्चा केली होती. शरद पवार यांच्या पक्षाकडून ॲड. एस. एन. जगताप आणि गणपतराव देवकाते यांनी अजित पवार यांच्याबरोबर बोलणी केली होती. प्रत्यक्षात तडजोडी झाल्याच नाहीत, त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढे चार पॅनेल रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वतीने युगेंद्र पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच, पवारांना या वेळी पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे कडवे आव्हान असणार आहे. कारण, दोन्ही पवार एकत्र असताना मागील पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली होती.

Sharad Pawar-Ranjan Taware-chandrarao Taware-Ajit Pawar
Maharashtra Political Live Updates : अजितदादांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे अजब गजब उत्तर

आता दोन्ही पवार निवडणुकीच्या मैदानात वेगवेगळ्या पॅनेलच्या माध्यमातून उतरले आहेत, त्यामुळे पवार गटाची ताकद दोन गटांत विखुरली गेली आहे, त्यामुळे या चौरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार, हे निवडणुकीच्या निकालातूनच दिसून येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com