PCMC Corporators : भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नवा वाद, महिलांना संधी नाहीच! निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा

BJP Corporators : स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी देण्यात येणाऱ्या सात जणांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. त्यांना केवळ पंधरा महिन्यांचा कालावधी देण्याचे नियोजन आहे.
PCMC
PCMCsarkarnama
Published on: 
Updated on: 

ज्ञानेश्वर भंडारे

BJP News : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या सात नावांची घोषणा महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी केली. सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या निवडीत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा असून, सातही जागांवर पुरुषांना संधी मिळाल्याने महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

भाजपकडून नियुक्त स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी पंधरा महिन्यांचा कालावधी देण्याचे नियोजन आहे. संबंधितांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आयुक्तांमार्फत नियुक्तीची प्रक्रिया राबवून प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. भाजपच्या सात नावांसोबत त्यांच्या नियुक्तीचाही प्रस्ताव सभेपुढे येणार आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी दावेदारी केली होती. पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी स्थानिक तसेच राज्यस्तरीय नेत्यांकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, जाहीर झालेल्या यादीत स्थान न मिळाल्याने जुन्या कार्यकर्त्यांसह काही आमदार समर्थकांमध्येही नाराजी आहे. निवड करताना पक्षनिष्ठेपेक्षा नेत्यांशी जवळीक आणि स्थानिक राजकीय समीकरणांना प्राधान्य मिळाल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

PCMC
BJP Operation Lotus : भाजपने माजी आमदार फोडला, एकनाथ शिंदेंचा मंत्री प्रचंड संतापला, इशारा देत म्हणाला, 'आम्ही टांगा...'

सातही जागांवर पुरुषांनाच संधी

महापालिका निवडणुकीत महिलांसाठी निम्म्या जागा आरक्षित असताना स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातूनही महिला कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या सात नावांमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सीमा सावळे यांना संधी दिली असताना भाजपकडून महिला प्रतिनिधित्वाचा विचार का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नऊ महिने रखडले; आणखी महिनाभर प्रतीक्षा

प्रशासनाने मार्चमध्ये स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव आणला होता. मात्र, भाजपकडून नावे निश्चित होण्यास विलंब झाल्याने प्रक्रिया सुमारे नऊ महिने रखडली. आता नावांची घोषणा झाली असली, तरी कागदपत्रांची पूर्तता, प्रशासकीय छाननी आणि सर्वसाधारण सभेची मान्यता हे टप्पे बाकी आहेत. त्यामुळे अधिकृत नियुक्तीसाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

पुढच्या टप्प्यात महिलांना संधी

महापालिकेतील भाजपचे सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले की, स्वीकृत सदस्यपदी पाच वर्षात एकूण २१ जणांना संधी देण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यात महिलांना संधी देण्यात येणार आहे

PCMC
Jalgaon NCP Rift : राष्ट्रवादीत गृहयुद्ध; संजय पवार यांचा डॉ. सतीश पाटलांवर गंभीर आरोप; 'जे पुतण्याचे झाले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.