PCMC Budget 2024 : पुराना है यह...! तब्बल पावणेसहा हजार कोटींचे बजेट; पण विदाऊट चर्चा अन् मिनिटांत मंजूर

Pimpri Chichwad Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे करमुक्त बजेट सादर करण्यात आले...
pcmc
pcmc Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पावणेसहा हजार कोटी रुपयांचे कुठलीही करवाढ,दरवाढ नसलेले इलेक्शन बजेट मंगळवारी (ता.२०) सादर झाले.महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने त्यावर कसलीही चर्चा न होता अवघ्या काही मिनिटात ते मंजूर झाले. दरम्यान,हे बजेट म्हणजे बाटली आणि त्यातील दारु असे दोन्हीही जुने,एवढेच नाही,तर या बाटलीचे बूच सुद्धा नवं नसल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे करमुक्त बजेट सादर करण्यात आले. त्यामुळे अशा बजेटची यावेळी हॅटट्रिक झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र,नव्या योजना वा प्रकल्प त्यांना मिळाले नाहीत. जुन्याच योजना (उदा. पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल) पुन्हा नव्या म्हणून सादर करण्यात आल्या. शहराला अत्यंत निकडीचा असलेला बर्न वॉर्ड आणि कॅन्सर रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची पुन्हा एकदा घोषणा झाली.या आर्थिक वर्षात,मात्र त्याचे काम नक्की सुरु केले जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह (Shekhar Singh) म्हणाले.

pcmc
Maratha Reservation Vishesh Adhiveshan: तीन मुख्यमंत्री, तीनदा मराठा आरक्षण…! आतातरी 'तिघाडा-बिघाडा' सुटणार?

करवाढ नसलेल्या बजेटची (Budget) हॅटट्रिक होणार अशी बातमी सरकारनामाने काल (ता.१९) पिंपरी महापालिकेचे हे बजेट सादर होण्याअगोदर काही तास दिली होती. ती खरी ठरली. गेल्यावेळेपेक्षा ५४३ कोटी रुपयांनी अधिक असलेल्या पाच हजार ८४१ कोटी

रुपयांच्या आणि नऊ कोटी रुपये शिलक राहील असा अंदाज असलेल्या या बजेटचे आयुक्तांनी तासभर प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर त्याला मान्यता देत असल्याचे त्यांनी लगेच जाहीर केले.आयुक्त म्हणून त्यांची छाप त्यावर दिसत नाही. तर,लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने त्यात करवाढ नाही. त्यामुळे सरकारचा ठसा त्यावर दिसून आला.(PCMC)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रस्ते अरुंद करत वाहतुकीची कोंडी करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपये खर्चाच्या अर्बन स्ट्रीट डिझायनुसार रस्ते विकसित करण्याच्या मलईदार कामावर,मात्र या बजेटमध्ये भर देण्यात आला आहे.मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढूनही त्याचे काम सुरु झालेले नाही.त्यामुळे इंद्रायणी व पवना नद्या पुर्नज्जीवन योजना,तर दूरच राहिली. शहरात गेल्या सव्वाचार वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून तो नियमित होईल की नाही,हे सुद्धा या बजेटमधून स्पष्ट करण्यात आलेले नाही. फक्त मालमत्ता कर कसा वाढतो याची टिमकी त्यात वाजविण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

pcmc
Ranajagjitsinha Patil : ओमराजेंविरोधात राणाजगजितसिंह पाटलांचा रोल ठरणार महत्त्वाचा; काय आहे धाराशिवचं गणित ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com