

PDCC Bank election News: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटातून राजगड तालुक्यात गेल्या ३६ वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदावर विराजमान असलेले ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर यांचे तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांवर प्राबल्य राहीले आहे. गेल्या ३१ वर्षांपासून ते बँकेवर बिनविरोध निवडून येत आहेत.
यावेळीही त्यांचे पारडे जड असून, तेच पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधकांमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते स्वतः निवडणूक लढवणार की, त्यांच्या चिरंजीवास संधी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रेवणनाथ दारवटकर गेल्या ३६ वर्षांपासून राजगड तालुक्यातून पुणे जिल्हा बँकेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. पहिली निवडणूक त्यांनी 1990-91 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर 31 वर्षे राजगड तालुक्यातून ते बिनविरोध संचालक म्हणून जिल्हा बँकेवर आहेत. 2006 मध्ये त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
राजगड तालुक्यामध्ये अ, ब, क, ड विविध गटामधील एकूण ४७ सोसायट्या आहेत. यामध्ये ‘अ’ वर्ग गटातील २४ विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्यापैकी २३ सोसायट्यांमधून आगामी होणाऱ्या पंचवार्षिक संचालक निवडीसाठी प्रतिनिधी निवड झाली आहे, तर राहिलेल्या एका म्हणजेच कुंबळजाई विविध कार्यकारी सोसायटीमध्ये दोन गटांमध्ये प्रतिनिधी निवडीबाबत संघर्ष झाल्याने दोन्हीही बाजूच्या सदस्यांनी संस्थेतून मतदान करण्यासाठी प्रतिनिधी न पाठवण्याचा ठराव केला आहे.
या २३ विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीच्या वेळेस कोणतेही संघर्षाचे चित्र तालुक्यामध्ये आढळले नाही. या सोसायट्यांवर दारवटकर यांचे प्राबल्य असून ते पुन्हा एकदा पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदावर बिनविरोध संचालक म्हणून निवडून जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार दहा वर्षापेक्षा अधिक संचालकपद उपभोगलेल्या संचालकांना निवडणूक लढवता येणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे रेवणनाथ दारवटकर हे त्यांचे उल्हास पुत्र दारवटकर यांना संधी देणार का?, याबाबत तालुक्यामध्ये उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.