BJP President Politics : भाजपमध्ये खळबळ! प्रदेशाध्यक्षांनाच पदावरून हटविण्याची मागणी? व्हायरल ऑडिओमुळे कर्नाटकमध्ये राजकीय वाद

Karnataka BJP president removal speculation : कर्नाटकातील राजकीय वाद काही केल्या थांबण्याची शक्यता दिसत नाही. येथे नुकताच काँग्रेसमधील वाद संपल्याची चर्चा असतानाच आता भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

karnataka politics : कर्नाटकातील राजकीय वाद अद्याप शांत झाल्याचे दिसत नाही आधी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलावरून जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. आता हाच संघर्ष विरोधी पक्ष भाजपमध्ये सुरू झाला आहे. भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना पदावरून हटविण्याची मागणी नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. याबाबत एक कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या कथित ऑडिओमध्ये माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा एका व्यक्तीशी इंग्रजीत संवाद साधताना ऐकू येत असल्याचा दावा केला आहे. तर संभाषणात विजयेंद्र यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार असून त्यांना त्यापूर्वी हटवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जर विजयेंद्र यांना हटवले तर पक्षात अनावश्यक वाद निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ऑडिओतील कथित संभाषणानुसार विजयेंद्र यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पदावरून दूर केल्यास त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप होणार नाही आणि पक्षातही कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, असेही सांगितलं आहे. तसेच त्यानंतर योग्य व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करावी, असेही त्यात म्हटल्याचा दावा आहे.

BJP
BJP Politics: ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरेंचे एवढे खासदार फोडल्यानंतरही मोदी-शहांची भीती कायम; भाजप पुढचा डाव कोणावर टाकणार?

दरम्यान, विजयेंद्र हे प्रदेशाध्यक्ष म्हणून लवकरच तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ साधारणपणे तीन वर्षांचा असतो. सदानंदगौडांचा प्रतिक्रियेस नकार या कथित ऑडिओबाबत माध्यमांनी विचारले असता सदानंद गौडा यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

BJP
BJP Politics : मुख्यमंत्री बदलताच आता विरोधी पक्षनेताही बलणार? भाजपमध्ये चर्चांना वेग, बड्या नेत्याचा पत्ता कट होणार

‘नो कॉमेंटस्‌’ तो ऑडिओ माझा आहे की नाही, याबाबत काही बोलणार नाही. आपल्याला या ऑडिओची माहिती नाही. त्याबाबत तुम्हीच शोध घ्या, असे ते म्हणत त्यांनी या प्रकरणावरर सध्यातरी बोलणं टाळलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com