

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी रात्री यासंदर्भातील आदेश काढले असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध पोलीस आयुक्तालयांमध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे. नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलीस दलातही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.
काही पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाल्याने त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशानुसार गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याकडे बावधन पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रुपाली बोबडे यांची पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची बदली वाकड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रणजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्याकडे दिघी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात ऋषिकेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आल्याने तेथील कामकाजाला नवे नेतृत्व मिळणार आहे.
दरम्यान, एक दिवसापूर्वीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातही मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. तेथे एकूण 10 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे दीपक सुर्वे यांची बदली सानपाडा येथे करण्यात आली आहे.
याशिवाय रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली असून खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांना उरण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.