Dnyaneshwar Palkhi : 350 वर्षांची परंपरा धोक्यात? विठोबा मंदिरातून पालखीचा मुक्काम हलवण्याच्या निर्णयावर संताप

Dnyaneshwar Maharaj Palkhi Halt: पुण्यातील पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर याबाबत आज निवडुंग विठोबा मंदिराचे विश्वस्त आणि स्थानिकांची आज बैठक झाली.
Dnyaneshwar Maharaj Palkhi Halt
Dnyaneshwar Maharaj Palkhi Haltsarkarnama
Published on
Updated on

Pune News : आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते. मात्र, वर्षानुवर्षांची ही परंपरा मोडीत काढून पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.

मागील वर्षी पालखी मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यात झालेल्या वादामुळे हे बदल करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी पालखी विठोबा मंदिर आणि त्याच्या परिसरातील जागा गर्दीसाठी अपुरी पडत असल्याचे कारण दिले आहे.

दुसरीकडे, पुणे महानगरपालिकेने आपल्या नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा अधिग्रहित करून भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.त्यामुळे पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्तांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मुक्कामाचे ठिकाण बदलण्यास विरोध दर्शवला आहे.

पुण्यातील पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर याबाबत आज निवडुंग विठोबा मंदिराचे विश्वस्त आणि स्थानिकांची आज बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत ठिकाण ,बदलून न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबतचे निवेदन देण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीनंतर बोलताना विश्वस्तानी सांगीतले पालखीचा मुक्काम हलवण्याचा घेण्यात आलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळे वेळप्रसंगी पालखीला आडवं पडू पण पालखी इथेच आणू असा आम्ही निर्धार केला आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi Halt
Maharashtra Govt News: सरकारी कर्मचाऱ्यांनो, 'हे' करा अन्यथा तुम्हाला पुढील पगार मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

पालखीचा मुक्काम बदलण्याचा निर्णय हा योगी निरंजन यांच्या आहे.मात्र या निर्णयामुळे वर्षांवर्षाची असलेली परंपरा मोडीत निघणार आहे. आणि ते कदापि सहन केले जाणार नाही.

या बाबत बोलताना भाजपचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, आळंदी देवस्थान ट्रस्ट कडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाच्या परंपरा मोडीत करण्याचा एक प्रस्ताव समोर करण्यात आलाय.मात्र 350 वर्षाची परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिराची पालखी सोहळा इतर कुठेही जाऊ देणार नाही. प्रसंगी आंदोलन करू चर्चा करून मार्ग काढू अशी भूमिका आमची आहे.

विठ्ठल मंदिर ट्रस्टकडून आळंदीत होणाऱ्या पालखी सोहळा बैठकीला आम्हाला निमंत्रण देण्याचे विनंती करणारे पत्र आम्ही पाठवला आहे. पालखी सोहळ्याची आतापासून पालखी करून तयारी सुरू करण्यात आली आहे.मात्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन यांच्या अट्टहासापाई वेगवेगळी कारण दिली जात आहेत.

याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू वेळप्रसंगी पालखीला आडवं पडू पण पालखी याच ठिकाणी मुक्कामी राहील यासाठी प्रयत्न करू अशी भूमिका स्थानिक नगरसेवक विशाल धनवडे आणि ट्रस्टच्या विश्वास यांनी मांडली.

Dnyaneshwar Maharaj Palkhi Halt
Raj Thackeray-Parth Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड; पार्थ पवारांनी गाठलं 'शिवतीर्थ'; राज ठाकरेंना काय सांगितलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com