पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 28 जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे प्रशासनाला देण्यात आली. देशभरात वाढत्या कोरोनाच्या (Corona Cases)पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोना संसर्गामुळं पुणे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन; तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रम, या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. पंतप्रधानांचा संभाव्य दौरा होणार नसल्याचे (Narendra Modi Pune Visit Cancelled) कळविण्यात आले आहे.
येत्या 28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुण्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या महिन्यात पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती.
भाजपनं अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं. मोदींच्या दैाऱ्यामुळे भाजपमध्य नवचैतन्य निर्माण होणार होते,. पण हा दैारा रद्द करण्यात आला आहे. देशात सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या दोन राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.
मोदींच्या सुरक्षेत चुक हा पूर्वनियोजित कट ; किरण बेदींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमधील चुक (Pm Security Breach) झाल्याची घटना नुकतीच पंजाबमध्ये घडली आहे. याबाबत पार्श्वभूमीवर माजी आयपीएस (IPS) अधिकारी किरण बेदी यांना मोठा आरोप केला आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चुक ही पूर्वनियोजित कट होता,'' असा गंभीर आरोप किरण बेदी (Kiran Bedi ) यांनी केला आहे.
मोदींच्या दैाऱ्यादरम्यान पंजाबचे पोलिस महासंचालक उपस्थित नव्हते. याबरोबर पंजाबचे गृहमंत्री आणि सचिव मोदींच्या दैाऱ्यादरम्यान उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी देखील यावेळी उपस्थित नव्हते. यामुळे मोदीच्या घातपाताचा कट होता का, असा संशय किरण बेदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौर्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.