PMC Election: शिंदेंना भाजप जागा देईना अन् ठाकरेंना महाविकास आघाडीही जागा सोडेना! पुण्यात नेमकं काय सुरु आहे?

PMC Seat Sharing Issue Shinde Sena and Thackeray Sena: भाजप विरोधात मनसे, दोन्ही राष्ट्रवादीसह आघाडीचे समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी झालेल्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत प्रस्तावांवर खलबते झाली आहेत.
PMC Seat Sharing Issue Shinde Sena and Thackeray Sena
PMC Seat Sharing Issue Shinde Sena and Thackeray SenaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप सोबत युतीत निवडणूक लढणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढणार आहे.

मात्र या दोन्ही पक्षांची परवड सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप शिंदे सेनेला 10 हुन अधिक जागा सोडण्यासाठी तयार नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील ठाकरेंच्या सेनेला अत्यंत कमी जागा दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.

पुण्यात भाजप विरोधात मनसे, दोन्ही राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी झालेल्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत प्रस्तावांवर खलबते झाली आहेत. आपल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या मंजुरीनंतरच या प्रस्तावावर येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी उभी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. महापालिका निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांबरोबर आघाडी व युती करण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे. पुणे महापालिकेत भाजपने अजित पवार गटबरोबर युती तोडत मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकटा पडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात आघाडीबाबत हालचाली सुरू झाल्या. अखेर चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

PMC Seat Sharing Issue Shinde Sena and Thackeray Sena
Bhagyashree Jagtap: विजयाचा गुलाल उधळल्यानंतर 24 तासातच त्या पुन्हा हातगाडीवर करताहेत फळविक्री

त्यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची रणनिती आखत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री प्राथमिक बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाचे प्रस्तावावर चर्चा झाली. २०१७ चे संख्याबळ आणि उर्वरित जागा वाटपावर खलबते झाली. या चर्चेमध्ये दोन्ही ठाकरे सेनेला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या असल्याचं समोर आला आहे.

ठाकरे सेनेच्या वाटातूनच मनसेला जागा

महाविकास आघाडीच्या काँग्रेस भवन येथे सुरू असलेल्या या चर्चांना मनसेला निमंत्रण नसल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेला या सर्व चर्चांपासून दूर ठेवण्यात आले असून ज्या जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत त्याच जागांमधून काही जागा मनसेला द्याव्या लागणार आहेत.

PMC Seat Sharing Issue Shinde Sena and Thackeray Sena
MNS: आदल्या दिवशी भावनिक पोस्ट, दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; मनसे नेत्यावर काळाचा घाला

बैठकीला कुणाची उपस्थित

या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून अंकुश काकडे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार बापुसाहेब पठारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, विशाल तांबे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, राजलक्ष्मी भोसले, काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे आणि ॲड. अभय छाजेड उपस्थित होते.

मुंबईचा हाय कमांड आज निर्णय घेणार

पुण्यातील बैठकीनंतर शहर काँग्रेस मुंबईत पक्षाच्या वरिष्ठांकडे जागा वाटपाचे सूत्र निश्चित करणार आहे. यासाठी गुरुवारी (दि.२५) मुंबई मध्ये बैठक होणार असून त्यामध्ये जागा वाटप प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com