PMC Corporators: पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना मिळणार प्रशिक्षण; पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय

PMC Corporators: महापालिकेच्या निवडणुकीत सभागृहामध्ये १०१ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.
PMC Election 2026
PMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

PMC Corporators: महापालिकेच्या निवडणुकीत सभागृहामध्ये १०१ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यांना महापालिकेच्या काराभाराची व्यवस्थित माहिती मिळावी, कायदे कळावेत. अधिकार आणि कर्तव्य याचीही माहिती व्हावी यासाठी प्रशासनातर्फे नगरसेवकांसाठी यशदामध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

PMC Election 2026
भारतीय राजकारणात बहुपक्षीय पद्धत का आहे? संविधानात तरतूद काय?

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुढील काही दिवसांत नगरसेवकांच्या हाती कारभार जाणार आहे. गेल्या पावणे चार वर्षापासून महापालिकेत प्रशासक राजवट होती, ती दोन आठवड्यात संपणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. १६५ जणांच्या सभागृहात १०१ नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तर ६४ नगरसेवक हे यापूर्वीही सभागृहात होते, त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे.

PMC Election 2026
Harshada Shirsat: शिवसेनेच्या नगरसेवकांना राहिलं नाही भान, तलवार नाचवत केला उन्माद! एकावर गुन्हा पण शिरसाटांच्या मुलीवर कारवाई नाही

पण नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रत्यक्ष सभागृहाचे काम कसे चालते, कोणत्या कायद्यानुसार काम चालते. त्यातील महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत? नगरसेवकांना कोणते अधिकारी आहेत? त्यांची कर्तव्य काय आहेत? त्याचप्रमाणे शहराच्या कामकाजात प्रशासनाची भूमिका आणि नगरसेवकाची भूमिका काय असते? दोन्ही मध्ये समन्वय असल्याचा त्याचा फायदा कसा होतो? यांसह अन्य विषयांवर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे.

PMC Election 2026
Danve Vs Khaire: खैरे की दानवे? ठाकरे सेना कोणाच्या नेतृत्वात लढणार संभाजीनगर झेडपीची निवडणूक; अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट

पुणे महापालिकेत अनेक नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या कामाची माहिती व्हावी यासाठी लवकरच यशदामध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com