
Pune News : खराडी येथील सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली होती. या प्रकरणी गुरुवारी पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली, ज्यात पोलिसांनी खेवलकर यांच्या फोनमधील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅटची माहिती सादर केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळले आहेत. त्यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत "ऐसा माल चाहिए" असा संदेश पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, पार्टीच्या ठिकाणी टेबलवर सिगारेटच्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी नमूद केले.
याबाबत सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, 'आरोपींनी तपासात सहकार्य केले नाही. अमली पदार्थ कुठून आले, किती पार्ट्या झाल्या, त्यात काय घडले, याचा तपास बाकी आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची (Police Custody) गरज आहे,' अंतिम अहवाल येणे बाकी असून, ड्रग्जच्या पुरवठ्याचा स्रोत शोधण्यासाठी अधिक तपास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोपीची वकील युक्तिवाद करताना म्हणाले, 'तपास चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे सांगत प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या दाव्यांना जोरदार आक्षेप घेतला. हे प्रकरण NDPS कायद्याचे आहे, पण पोलिस व्हिडिओ आणि चॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत. मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांकडे आहेत. तपास पूर्ण झाला आहे, तरीही जुनीच कारणे देऊन कोठडी मागितली जात आहे.' असे खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.
खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'माल चाहिए हा मेसेज आता कुठून आला?' पूजा सिंग नावाची व्यक्ती प्लांट केली आहे. ड्रग्ज अहवाल सात दिवसांनंतरही आला नाही. अमली पदार्थाचे वजनही नोंदवले गेले नाही,' असा दावा ठोंबरे यांनी केला. जुन्याच गोष्टींसाठी पोलीस कोठडी मागण्यात येत असल्याने ती देण्यात येऊ नये, असे देखील असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.