

Pune News : पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने मध्यरात्री मोठी कारवाई केली. आळंदी- मरकळ रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये तरुणी-तरुणींसह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. यातील अनेक जण आयटीयन्स असल्याची माहिती आहे.
तब्बल 60 ते 70 तरुण तरुणी पार्टीत सहभागी झाल्याची माहिती आहे. झिंगलेल्या अवस्थेत असलेले हे आयटीयन्सनी कोणती नशा केली याचा तपास पोलिस करत आहेत. या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
शहराच्या बाहेर उपनगरामध्ये, गावामध्ये रिसाॅर्ट किंवा बंगाल्यावर पार्टी करण्याचा ट्रेंड आयटीयन्समध्ये आहे. मात्र, अशा पार्ट्यांध्ये अंमली पदार्थांवर वापर होत असल्याने अशा पार्टींवर पोलिसांची नजर होती. पोलिसांना पुणे शहराजवळ असणाऱ्या आळंदी- मरकळ रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये अशीच पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून त्या विरोधात कारवाई केली. या पार्टीला प्रोजेट एक्स असे नाव देण्यात आले होते.या पार्टीत मध्यरात्रीपर्यंत तरुण तरुणी दारु आणि मादक पदार्थ घेऊन धांगड धिंगाणा करत होता. दरम्यान, या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे.
प्रोजेक्ट एक्स नावाने आयोजित केलेल्या पार्टीच्या आयोजकांवर पोलिस मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. पार्टीमध्ये अंमली पदार्थांच्या वापराबाबत पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, अशी पार्टी आयोजित करण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असते मात्र नियम धाब्यावर बसवून पार्टी आयोजित करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्यविक्री तेथे सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले संशयित अंमली पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.