Pimpri Political News : राजकीय हस्तक्षेपातून तळेगावात 'सीओ' बदलीचा खेळ...

Talegaon Muncipal Officer Transfer : ७२ तासांत झाले दोन मुख्याधिकारी ; मॅटच्या आदेशाने राज्य सरकार पडले तोंडघशी.
Vijaykumar Sarnaik And N. K. Patil
Vijaykumar Sarnaik And N. K. PatilSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Political News : तळेगाव दाभाडे ( ता. मावळ, जि. पुणे ) नगरपरिषदेच्या 'सीओं'च्या बदलीचा खेळ चांगलाच रंगलेला दिसत आहे. ७२ तासांत दोन अधिकाऱ्यांची बदली झाल्याने बदलीमागे सुरू असलेला राजकीय हस्तक्षेप समोर आला आहे. एक हजर झाले असताना लगेचच दुसऱ्या 'सीओं'ची मॅटच्या आदेशाने बदली झाल्याने राज्य सरकार तोंडघशी पडले आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने तळेगाव Talegaon दाभाडे नगरपरिषदेचे सीओ विजयकुमार सरनाईक यांचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत सात महिन्य़ांत यावर्षी २१ एप्रिलला बदली केली होती. १ डिसेंबरला पुन्हा त्यांची बदली तळेगावलाच सीओ म्हणून करण्यात आली. त्यानुसार त्यांनी दि. ४ रोजी पदभार स्वीकारला. आता मॅटच्या आदेशाने एन. के. पाटील हे जुने सीओ म्हणून तळेगावात पुन्हा ७२ तासांत आज दि. ७ रोजी हजर झाले.

Vijaykumar Sarnaik And N. K. Patil
Chitra Wagh: पक्षासाठी झटूनही चित्रा वाघांना संधी नाही; त्यासाठीच केली होती का आगपाखड ?

राजकीय हस्तक्षेपातून तळेगावात हा प्रकार सुरू झाला असून, त्यातून तळेगावकरांना वेठीस धरले जात आहे. त्यांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. या राजकीय हस्तक्षेपातूनच नगरविकास विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त स्मिता झगडे यांना अतिरिक्त आयुक्तपदी तेथेच नगरविकास विभागाने बढती दिली.

पण, एका सत्ताधारी स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी झगडे यांना बढती दिलीच नाही. एवढेच नाही तर नंतर त्यांची प्रमोशनवरील बदली रद्द करण्यात येऊन त्यांना मूळ पदावरच ठेवले गेले. नंतर तेथूनसुद्धा शहराबाहेर त्य़ांना बदलीवर पाठवण्यात आले. या वादग्रस्त बदली आणि बदली प्रकरणावरील धूळ खाली बसली नाही तोच तळेगावातील नगरविकासचा राजकीय हस्तक्षेपाचा दुसरा भोंगळ कारभार आता समोर आला आहे.

तळेगावात सीओंची मुदतपूर्व बदली होत असल्यामुळे तळेगावकर अगोदरच त्रस्त आहेत. यापूर्वीचे सीओ सरनाईक यांची मुदतपूर्व उचलबांगडी शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांच्या शिफारसीवरून झाली. तेथे त्यांनी आपल्या मर्जीतील पण अकार्यक्षम पाटील यांना आणल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) स्थानिक आमदार सुनील शेळके Sunil Shelke यांनी केला.

पाटील यांच्या कारभारामुळे तळेगावकर त्रस्त झाल्याने त्यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार १ डिसेंबरला ती होऊन सरनाईक हे पुन्हा तळेगावात आले. तेथील सीओ पाटील यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाली होती, पण तेथे ते हजर न होता त्यांनी आपल्या बदलीला मॅटमध्ये आव्हान दिले. तेथे तिला परवा दि. ५ रोजी स्थगिती मिळाल्याने ते तळेगावात पुन्हा आज हजर झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तळेगाव नगरपरिषद सीओ म्हणून आज काम सुरू केले. कारण तो पदभार सोडलाच नव्हता. बदलीच्या नव्या ठिकाणी हजरही झालो नव्हतो. तसेच बदली स्थगित होऊन पुन्हा त्याच पदावर हजर होण्याचा आदेश मॅटने दिल्याने नव्याने पदभार घेण्याचा प्रश्नच नसल्याचे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले, तर दि. ४ रोजी पदभार हाती घेतल्यानंतर सरनाईक हे दोन दिवसांच्या रजेवर गेले होते.

त्याच काळात मॅटचा आदेश येऊन पाटील हे सीओ म्हणून आज हजर झाले. त्यामुळे सरनाईक यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली आहे. कारण इकडे पिंपरी-चिंचवड पालिकेतील सहायक आयुक्तपदाचा आपला चार्ज त्यांनी सोडला आहे, तर तळेगावात त्यांच्या जागेवर पाटील हे हजर झाले आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाच्या नव्या आदेशाची आता वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामा'ला दिली.

Edited By : Amol Sutar

Vijaykumar Sarnaik And N. K. Patil
Corruption Report : महाराष्ट्र नाही महा'भ्रष्टाचारी'राष्ट्र ; NCRB चा आणखी एक धक्कादायक अहवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com