Pune Metro मोदींच्या एका तिकीटावर सगळ्यांचा मेट्रोचा प्रवास

Pune metro| PM Narendra Modi| मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून (७ मार्चपासून) या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
Prime Minister Narendra Modi inaugurated the Pune Metro
Prime Minister Narendra Modi inaugurated the Pune MetroTwitter/@ANI
Published on: 
Updated on: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. ग्रीन सिग्नल देत त्यांनी मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर पर्यंत प्रवासही केला. या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महापौर मुरलीधर मोहोळ, मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना यावेळी तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला.

मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून (७ मार्चपासून) या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यातील वनाझ ते रामवाडी हा 13 किलोमीटरचा मार्गा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मेट्रो मार्गाचे काम पुर्ण झाले आहे.

Prime Minister Narendra Modi inaugurated the Pune Metro
PM मोदींचे विमान पुण्यात उतण्यापूर्वीच महापौर मोहोळांवर ओढावली नामुष्की

तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा दूसरा मार्ग आहे. हा 12 किलोमीटरचा मार्ग असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटर मार्गाचे कामही तयार झालं आहे. या दोन मेट्रो मार्गांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे.

सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येईल. पुणे शहरात वनाझ ते रामवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास करण्यासाठी पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये इतकी तिकीटाची रक्कम आहे. म्हणजे वनाझ ते गरवारे स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.

तर पिंपरी- ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वीस रुपयांचे तिकीट असेल. सध्या या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या आहेत. प्रत्येक डब्याची 325 प्रवासी क्षमता आहे. तीनपैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल.

दरम्यान, ''मोदीजी आले, मोदीजी आले, अरे हो इलेक्शन आले..'' अशा आशयाच्या फलक राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दैारा असल्याचे नकळत राष्ट्रवादीने या फलकाच्या माध्यमातून सांगितले आहे. समाज माध्यमांवर या फलकाची चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात, महापालिकेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी होणार आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस मात्र मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करणार असून त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.