Anti Corruption Bureau : ...म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं ५० हजारांची लाच मागितली, लाचलुचपतची मोठी कारवाई

Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली
Anti Corruption News, Aurangabad
Anti Corruption News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षकावर मोठी कारवाई केली आहे. बदली चालकाने परस्पर कर्नाटकात नेलेली कार परत मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

शशिकांत नारायण पवार असे या पोलीस उपनिरीक्षकाचे(PSI) नाव आहे. सध्या ते सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत अभिरुची पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. लाचलुचपतकडून पवार यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anti Corruption News, Aurangabad
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘जनआरोग्य योजना मागे घ्या; अन्यथा...’

काय आहे प्रकरण?

संबंधित प्रकरणातील तक्रारदाराच्या मालकीची चारचाकी गाडी त्यांचा बदली चालक परस्पर घेऊन कर्नाटकात गेला होता. हे वाहन परत मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी शशिकांत पवार यांच्याकडे आली होती. ती कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली.

Anti Corruption News, Aurangabad
Shinde Vs Thackeray : एकनाथ शिंदे पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का देणार? आमदार, खासदारांनंतर आता मोर्चा...

लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(Anti Corruption Bureau) कडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तडजोडीत २० हजार रुपये घेण्याची तयारी पवार याने दर्शविल्याचं लाचलुचपत विभागाच्या निदर्शनास आले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक पवार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक विजयमाला पवार करत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com