PMC Hospital: श्रीनाथ भिमालेंचे मनसुबे CM फडणवीसांनी उधळले : वडिलांचे नाव दिलेल्या हॉस्पिटलचे नाव बदलणार

Baner Cancer Hospital, Mukta Tilak, Shrinath Bhimale: बाणेर येथील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. श्रीनाथ भिमाले यांचा प्रस्ताव मागे पडत मुक्ता टिळक यांचे नाव देण्याची चर्चा सुरू आहे.
Shrinath Bhimale
Shrinath Bhimale Sarkarnama
Published on
Updated on

PMC Hospital News: बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाच्या नामकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या रुग्णालयाला आपले वडील स्वर्गीय यशवंतराव भिमाले यांचे नाव देण्यासाठी लावलेला जोर थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निकामी ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रुग्णालयाला पुण्याच्या माजी महापौर आणि दिवंगत आमदारांचे नाव देण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे भिमालेंच्या मनसुब्यांना मोठा चाप बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Shrinath Bhimale
Maharashtra Politics Live Update: पोलिसांनी मोर्चा काढण्याआधीच राजू शेट्टी, सपकाळांसह सर्वपक्षीय नेत्यांना घेतलं ताब्यात

भिमालेंचा 'तो' प्रयत्न फसला

बाणेर येथे पुणे महापालिका आणि आपुलकी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर १५० खाटांचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, हे रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच त्याच्या नामकरणावरून राजकीय आखाडा तयार झाला होता. श्रीनाथ भिमाले यांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया पूर्ण न करता, आपल्या वडिलांचे नाव या रुग्णालयाला देण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू केल्याचा आरोप विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी त्याबाबतचे बोर्ड देखील लावण्यात आले होते. मात्र वाढता विरोध पाहता हे बोर्ड हटवावे लागले होते.

यावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. "महापालिकेच्या पैशातून, म्हणजेच जनतेच्या करातून उभारल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रकल्पांना राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांची नावे देण्याची ही नवी परंपरा अत्यंत धोकादायक आहे," अशा शब्दांत देशमुख यांनी प्रशासनाला घेरले होते. हा वाद वाढल्याने महापालिका आणि भाजप बॅकफूटवर गेली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत वाद मिटवला असल्याचं बोललं जात आहे.

Shrinath Bhimale
Maharashtra News Live Update : विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुक्ता टिळक यांचे नाव

दरम्यान कर्करोगाशी प्रदीर्घ आणि अत्यंत धैर्याने झुंज देत असतानाच २२ डिसेंबर २०२२ रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला मुक्ता टिळक यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com