Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी (ता.1) पुण्यामध्ये केंद्रातील निरीक्षकांनी येऊन भाजप पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली आहेत. या मतांच्या आधारे प्रत्येक मतदारसंघातून तीन नाव निश्चित करण्यात आली आहे.
एकीकडे उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरू असताना दुसरीकडे कसबा विधानसभेच्या (Assembly Election) उमेदवारीसाठी भाजपच्या दोन नेत्यांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) गड बनला होता.मात्र मागील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. हा पराभव भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला. त्यामुळे पराभव झाल्यानंतर लगेचच भाजपची स्थानिक मंडळी या भागात कामाला लागल्याचे पाहायला मिळाली.
यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारसंघामधून भाजप उमेदवार असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना चांगलं मताधिक्य मिळाले तर पोट निवडणुकीत विजय झालेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना मोठा फटका बसला.
लोकसभेच्या गणितांमुळे कसबा विधानसभा मतदारसंघाबाबत भाजपाच्या आशा पल्लवित झाले आहेत. त्यामुळे मागील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झालेले हेमंत रासने यंदा कंबर कसून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
दुसरीकडे मागील पोटनिवडणुकीमध्ये संधी न मिळाल्याने यंदाची निवडणूक लढवायची असाच चंग भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बांधला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे आणि त्याचाच भाग म्हणून रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत. या पोस्टवरच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न या इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत त्याचा बोलला जात आहे.
दरम्यान, आज कसबा विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांकडून मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यात आला। यासाठी बंद लिफाफ्यामध्ये पसंती क्रमानुसार तीन नावे देण्यास सांगण्यात आलं आहे. मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, शहर, राज्य तसेच प्रदेशावर काम करणारे पदाधिकारी यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली.
हे बंद लिफाफे थेट प्रदेश कार्यालयामध्ये उघडले जाणार असून पक्षाकडून करण्यात आलेला सर्व्हे, मतदारसंघातील कामगिरी हे मुद्दे लक्षात घेत उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. कसबा मतदारसंघात शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख हेमंत रासने, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट इच्छुक आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.