Ranjitsinh Mohite Patil : रणजितदादांची पुढची राजकीय इनिंग काँग्रेस की पवारांच्या राष्ट्रवादीतून?

Solapur Politics : रणजितसिंह मोहिते पाटील यांची कार्यक्रमाला हजेरी आणि केलेले भाषण विशेष चर्चेचे विषय झाले. विशेषतः सोलापूरसाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहे, असे केलेले विधान त्यांची आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणारे ठरले आहे.
Ranjitsinh Mohite Patil
Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 September : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवस सत्काराचे निमित्त साधून अकलूजच्या मोहिते पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या गटाला चार्ज करण्याचा प्रयत्न केला आहे. याच कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ‘सोलापूर आणि महाराष्ट्रासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे,’ असे विधान केले. त्यातून रणजितसिंह यांनी आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे मोहिते पाटील हे आगामी राजकीय इनिंग काँग्रेसकडून खेळणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल निश्चित करतात, याकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेत्यांना एकत्र आणत राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावत केलेले भाषण या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

रणजितसिंह मोहिते पाटील यांची कार्यक्रमाला हजेरी आणि केलेले भाषण विशेष चर्चेचे विषय झाले. विशेषतः सोलापूरसाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहे, असे केलेले विधान त्यांची आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणारे ठरले आहे. त्यामुळे आगामी काळात रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय भूमिका बदलणार का, हे पाहावे लागणार आहे.

Ranjitsinh Mohite Patil
Solapur Congress : दुटप्पी भूमिका; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात सहभागी काँग्रेस नेत्याविरोधात ऊस उत्पादकांचा ‘ठिय्या’

लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येऊन लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी निवडणुकीत विजयही मिळविला. त्या निवडणुकीपासून मोहिते पाटील कुटुंबीय हे भाजपपासून दुरावल्याचे चित्र होते.

रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका मात्र काहीशी दोलायमान दिसत होती. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे त्यांच्या मनात भाजपबाबत आस्था जाणवत होती. मात्र, मधल्या काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे तेही भाजपपासून दुरावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.

वास्तविक, पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश पातळीवरील अधिवेशनाला आमदार मोहिते पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र, ते मनाने भाजपपासून दूर गेल्याचे स्पष्ट होत होते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी रणजितदादांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मांदियाळीत साधली. तडजोडीची भाषा करत आगामी राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट संकेत दिले.

Ranjitsinh Mohite Patil
Solapur BJP : मातब्बर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज; हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, त्यामुळे ते आगामी काळात ते काँग्रेस पक्षात जातात की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपले पुढील राजकीय भवितव्य घडवतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com