Ravindra Dhangekar Joins Shiv Sena : ठरलं! आज रवींद्र धंगेकर करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश...

Former Congress MLA Ravindra Dhangekar Eknath Shinde Shiv Sena Thane : काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर आज ठाणे इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Ravindra Dhangekar Eknath Shinde
Ravindra Dhangekar Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेशाबाबतच्या त्याच्यानं उधाण आलं होतं.

या चर्चांना आज सायंकाळी विराम मिळण्याची शक्यता आहे. आज ठाण्यामध्ये धंगेकर शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सुरवातीला पुणे लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते रवींद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्तच असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पक्षापासून अलिप्त असलेले धंगेकर अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने रवींद्र धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर स्टेटस आणि भेटीगाठीतून धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश याबाबतचे संकेत देत होते.

Ravindra Dhangekar Eknath Shinde
Shama Mohammed salute Rohit Sharma : ..अन् आधी नावं ठेवणाऱ्या शमा मोहम्मद यांनी अखेर रोहित शर्माला केला सलाम!

पुणे (Pune) महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नियुक्ती नुकतीच करण्यात आले आहेत. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना डावले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होती.

Ravindra Dhangekar Eknath Shinde
Congress Leader Attack : चंद्रपूर गोळीबारानं हादरलं! काँग्रेस शहराध्यक्षाच्या निवासस्थानावर हल्ला

त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स ठेवले होते. ज्यामध्ये गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो वापरून त्याला 'तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी,तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही', हे गाणं स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकियांना सूचित इशारा दिला होता. यामुळे व्हाट्सअप स्टेटसनंतर धंगेकरांनी शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याचा विचार पक्का केलाय, असं सर्वत्र बोललं गेलं.

ज्या पद्धतीने राज्यामध्ये 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील शिंदेसेनेकडून मिशन पुणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या मिशन पुणे अंतर्गत रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केला होता. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील आपण कार्यकर्त्यांची चर्चा करून मग पक्षप्रवेशाबाबत काय तो निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी ते सातत्याने आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगत होते.

मात्र आज अखेर रवींद्र धंगेकर हे शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचा प्रवेश होणार आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासोबत पुण्यातून आणखी कोण कोण शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com