NCP leader Jitendra Awhad
NCP leader Jitendra Awhad Sarkarnama

Sharad Pawar leader riot case: जितेंद्र आव्हाडांवर दंगल घडवल्याचा आरोप : पुणे कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Sharad Pawar party leader court decision News : फर्ग्युसन महाविद्यालयातील 2016 च्या विद्यार्थी संघर्ष प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणात आता महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
Published on

Pune News : फर्ग्युसन महाविद्यालयातील 2016 च्या विद्यार्थी संघर्ष प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्याबाबत पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणात आता महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार बेकायदा जमाव जमविणे, दंगल माजविणे, इतरांचे जीवित किंवा सुरक्षितता धोक्यात आणणे आदी कलमांनुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय होती घटना

23 मार्च 2016 रोजी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी-डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद दलित विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येनंतर आणि जेएनयूतील कथित देशविरोधी घोषणांमुळे पेटला होता.

NCP leader Jitendra Awhad
Shivsena News : पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा 'पहिला आमदार' ठाकरेंची साथ सोडणार? एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा फत्ते

एनएसयूआय कार्यकर्त्यांसोबत आव्हाड कॉलेजमध्ये गेले. तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर दगड, बाटल्या व चपला फेकल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार बेकायदा जमाव जमविणे, दंगल माजविणे, इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, इतरांचे जीवित किंवा सुरक्षितता धोक्यात आणणे आदी कलमांनुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

NCP leader Jitendra Awhad
BJP News : ठाकरे, शिंदे, पवारांची माणसे फोडा! भाजपचे मिशन महापालिका : 2029 डोळ्यांसमोर ठेवून आतापासून पायाभरणी

याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांना दोषमुक्त करण्यात नकार दिला होता. याविरोधात आव्हाड यांनी अॅड. हर्षद निंबाळकर यांच्या माध्यमातून सत्र न्यायालयात फौजदारी फेरविचार अर्ज दाखल केला.

NCP leader Jitendra Awhad
Congress News : छत्रपती संभाजीनगर महिला काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून भडका; थेट दिल्लीत उपोषणाचा इशारा!

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, आव्हाड पीडित असूनही चुकीने आरोपी ठरवले गेले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आव्हाड यांना सर्व आरोपांमधून निर्दोष सोडले. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.

NCP leader Jitendra Awhad
NCP Pune : स्वतःची उमेदवारी जाहीर करून गोंधळ घालू नका, अजितदादांच्या शिलेदारांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com