Pune Water Conservation: पुणे जिल्ह्यातील १,४०५ गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा 'ॲक्शन प्लॅन',प्रत्येक गावांत केली जाणार 'ही' 2 कामे!

Pune Drought Action Plan: संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील १,४०५ ग्रामपंचायतींसाठी जलसंधारण आराखडा तयार करण्यात आला आहे. शोषखड्डे, विहीर पुनर्भरण आणि अन्य कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Pune Drought Action Plan
Pune Drought Action PlanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought News : संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गावागावांत पाणी अडविणे, जमिनीत पाणी जिरविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्ही. बी. जी. राम जी. अंतर्गत जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील १ हजार ४०५ ग्रामपंचायतींचा विचार करून विविध शासकीय विभागांना कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, पाणंद रस्ते, वृक्षलागवड यांसह विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता केवळ टँकरवर अवलंबून न राहता गावपातळीवरच पाण्याची उपलब्धता वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पावसाचे पाणी अडविणे, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि मृदसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या कामांमधून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाला कामांचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्थानिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन कामांचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune Drought Action Plan
Kendrapramukh Recruitment: केंद्रप्रमुख होण्याचा मार्ग मोकळा! भरतीवरची टांगती तलवार हटली! कोर्टानं याचिका फेटाळल्या; 2 हजार 410 उमेदवारांना दिलासा

१४ हजार शोषखड्डे, विहीर पुनर्भरणाची कामे

ग्रामपंचायत स्तरावर शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाला सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाडेप आणि गांडूळ खत प्रकल्पांसाठी प्रत्येकी १४ हजार ५० कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची ४ हजार २१५ कामे, तर पाणंद रस्त्यांची १ हजार ४०५ कामे प्रस्तावित आहेत.

जलसाठे वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न

मृद व जलसंधारण विभागामार्फत पाझर तलावांमधील गाळ काढणे, तलावांची दुरुस्ती, नाला खोलीकरण, दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग आणि माती नाला बांध अशी कामे केली जाणार आहेत. यातील दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग आणि माती नाला बांध या प्रत्येक गावामध्ये दोन कामे याप्रमाणे २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पाझर तलावांमधील गाळ काढल्यामुळे त्यांची पाणी साठविण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच नाल्यांचे सरळीकरण आणि खोलीकरण केल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचा साठा आणि भूजल पुनर्भरणासाठी उपयोग होऊ शकणार आहे.

Pune Drought Action Plan
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन बँकेत मेगाभरती; 1500 जागांसाठी असा करा अर्ज?

वृक्षलागवड आणि पाणंद रस्त्यांनाही प्राधान्य

सामाजिक वनीकरण विभागाला प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन वैयक्तिक वृक्षलागवडीची कामे, याप्रमाणे २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रोपवाटिका उभारण्याचेही नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

दरम्यान, मंजूर झालेली सर्व कामे शेल्फवर ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गरजेनुसार कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. आता या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि त्यातून गावपातळीवर जलसाठा वाढण्यास किती मदत होते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.