Farmers Scheme : दुष्काळाची टांगती तलवार! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे योजना जाहीर, 'महाडीबीटी'वर अशी करा नोंदणी!

Pune district free seeds scheme for farmers : पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे योजनेची घोषणा. महाडीबीटीवर नोंदणी कशी करायची, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती जाणून घ्या.
Maharashtra drought relief
Maharashtra drought reliefSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उप अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे उपलब्ध होणार असून, कमी पाण्यातही उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

कमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात येणारे आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणारे ज्वारीचे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी ज्वारी सन २०२६-२७ या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Maharashtra drought relief
Karjat Power Projects : सह्याद्रीवर प्रकल्पांचा घाव! 59 जलविद्युत प्रकल्पांमुळे जंगले, नद्या, आदिवासींचे अस्तित्व धोक्यात; 11 हजार एकर जमीन होणार बाधित?

या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी ६३४ क्विंटल ज्वारी बियाणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यास प्रतिकूल हवामानातही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्याचबरोबर चारा उत्पादन वाढल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकतो. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

एका मिनीकिटमध्ये नेमकं काय मिळणार

योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका मिनीकिटमध्ये चार किलो ज्वारी बियाणे देण्यात येणार आहे. यामध्ये परभणी सुपरमोती, फुले यशोमती आणि पीकेव्ही शक्ती या सुधारित वाणांचा समावेश आहे. याशिवाय पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त जैविक खत आणि ज्वारीच्या योग्य लागवडीसाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Maharashtra drought relief
Manoj Jarange Patil : 500 कोटींचा वाद पेटला! मनोज जरांगे पाटलांचा मास्टरस्ट्रोक; थेट 'हा' मोठा निर्णय घेत सरकारला ललकारले

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’

या योजनेतील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध बियाणांचा योग्य वापर करून वेळेत पेरणी करावी, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com