FDA : पुण्यात एफडीएचा मिठाई-फराळ विक्रेत्यांवर छापा; २० परवाने निलंबित! तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस

FDA inspection Pune: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे एफडीएकडून मिठाई आणि फराळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. मोहिमेत २० परवाने निलंबित, तीन आस्थापनांना बंदची नोटीस आणि ४९ लाखांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
FDA inspection Pune
FDA inspection PuneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune FDA inspection News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि फराळाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागात दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २० अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत १४ हजार ४२१ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत तब्बल ४९ लाख ३९ हजार ९५१ रुपये आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा फायदा घेत काही व्यावसायिकांकडून निकृष्ट दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मिठाई व फराळ उत्पादक, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, खाद्यतेल विक्रेते यांच्यासह विविध अन्न व्यावसायिकांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची निर्मिती आणि साठवणूक, वैध परवान्याशिवाय व्यवसाय, अन्नपदार्थांच्या लेबलिंगमधील त्रुटी तसेच विहित दर्जाचे निकष पूर्ण न करणारे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळून आले. या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांविरोधात कारवाई केली.

FDA inspection Pune
Gokul Sangharsh Morcha : ‘गोकुळ’वरून संघर्ष पेटला; 'पायतान हाणा..!' म्हणत झळकले बॅनर्स, बळीराजा अन् यमासह रेडाही रस्त्यावर

तीन आस्थापनांवर थेट कारवाई

व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आलेल्या पुण्यातील आस्थापनांमध्ये शिक्रापूर येथील गणेश लाडूवाले, वानवडी येथील पोर्णिमा स्टेटस आणि बिबवेवाडी येथील सरवी स्वीट्स यांचा समावेश आहे. या ठिकाणी वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवणे, अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची निर्मिती करणे आणि निकृष्ट दर्जाचे तसेच असुरक्षित अन्नपदार्थ साठवून ठेवणे, अशा त्रुटी आढळल्या.

या कारवाईत मोतीचूर लाडू, बुंदी, पेढा, बर्फी, हलवा, कराची, चकली, मावा, पनीर, दही, दूध, गूळ, खाद्यतेल, ड्रायफ्रूट उत्पादने, बेसन आदी विविध अन्नपदार्थांचा साठा तपासणीच्या कक्षेत आला. संशयित निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर प्रशासनाने कारवाई केली.

FDA inspection Pune
Mumbai-Pune: एक्स्प्रेसवे अन् मिसिंग लिंकनंतर मुंबई-पुणे प्रवास आता आणखी वेगवान अन् ट्राफिकमुक्त होणार; MSRDCनं घेतला मोठा निर्णय

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवरही कारवाई

दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधातही एफडीएने स्वतंत्र मोहीम राबविली. यामध्ये ८६ हजार ४४७ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एक एफआयआर दाखल करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित विक्रीचे वाहन जप्त करण्याबरोबरच आस्थापनाही सील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.