Pune Graduate Constituency: 'पदवीधर' नोंदणीत राष्ट्रवादीची मुसंडी; भाजपची यंत्रणा सैल, महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच!

Pune Graduate Constituency election 2026: पुणे पदवीधर मध्ये महायुतीमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून या जागांवर दावा केला जात आहे.
BJP organization Pune Graduate Constituency
NCP gains in Pune graduate voter registrationSarkarnama
Published on
Updated on

Pune Graduate Constituency election candidates: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये या जागेवरून उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाणार?

यावरून सध्या रस्सीखेच सुरू असून मतदार नोंदणी वरच उमेदवारीचा कल पक्षांकडे झुकणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदवीधर नोंदणीत आघाडी घेतली जात असून भाजपची यंत्रणा सैल झाल्याचे चित्र आहे. सध्या या मतदारसंघावर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मात्र त्या दृष्टीने अद्याप हालचाली थंड असल्याचे चित्र आहे.

पुणे पदवीधर मध्ये महायुतीमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून या जागांवर दावा केला जात आहे. भाजपकडून शरद लाड तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून भैया माने हे पदवीधर साठी इच्छुक आहेत. सध्याच्या घडीला आपापल्या स्तरावर पदवीधर नोंदणी सुरू आहे.

पक्षीय पातळीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आतापर्यंत 90 हजार पेक्षा जास्त पदवीधरांची नोंदणी झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर भाजप आतापर्यंत 80 हजारपर्यंत पोहचला असल्याचे चित्र आहे. तर भाजपकडून इच्छुक असलेल्या शरद लाड यांच्याकडून जवळपास 80 हजार नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे.

BJP organization Pune Graduate Constituency
CGHS New Rules: सरकारी कर्मचारी, पेन्शनर्ससाठी नवा नियम! ₹3,000 पेक्षा जास्त मेडिकल टेस्ट करणार असाल तर सावधान!

आठ दिवसांपूर्वी इचलकरंजी दौऱ्यावर असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघावर भाजपचाच दावा असल्याचे स्पष्ट केलं होतं. शिवाय शिक्षक मधून इच्छुक असलेले कौस्तुभ गावडे यांना सोबत घेऊनच त्यांचा दौरा सुरू आहे. अशा परिस्थितीत पदवीधर नोंदणीकडे अधून मधून माहिती घेतात. पण प्रत्यक्ष नोंदणीत भाजपकडून भाजपकडून आघाडी नाही.

BJP organization Pune Graduate Constituency
OBC Reservation : 10 टक्के आरक्षण, ‘कुणबीकरणा’चाही धडाका: OBC आरक्षणाला भगदाड पाडून मराठा समाजच सर्वात मोठा लाभार्थी!

दरम्यान, इकडे महाविकास आघाडीमध्ये देखील पुणे पदवीधर वरून अद्याप शांतताच आहे. सांगलीतून श्वेता देशमुख या महायुतीकडून पदवीधर साठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरेचसे गणित अवलंबून आहे. जर उमेदवारी भाजपकडे गेले तर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आतापर्यंत झालेली पदवीधर नोंदणी (15 जून पर्यंत आकडेवारी )

12 जानेवारी 2026 पर्यंत

  • पुणे - 61071

  • सातारा - 41377

  • सांगली -75958

  • कोल्हापूर - 90786

  • सोलापूर - 36864

BJP organization Pune Graduate Constituency
Girish Mahajan: गिरीश महाजनांचे राऊतांना थेट चॅलेंज; ‘जामनेर पॅटर्न’चा आरोप फेटाळत म्हणाले, 'ZPमध्ये ताकद दाखवा!'

12 जानेवारी ते 15 जून 2026 पर्यंत ( आजपर्यंत एकूण)

  • सोलापूर - 1543 ( 39 हजार 407)

  • सातारा - 1993 ( 43 हजार 330)

  • सांगली - 751 (76 हजार 709)

  • कोल्हापूर - 592 ( 91 हजार 378)

  • पुणे - 4193 (65 हजार 264)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com