Pune Hit and Run Case : हवे तेवढे पैसे देतो, म्हणणाऱ्या 'आजोबा' सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी

Surendra Agarwal : पोलिस स्टेशनमधून ड्रायव्हरला सोडले असता सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला जबरदस्तीने आपल्या घरी नेले. मोबाईल काढून घेतला आणि त्याला एका खोलीमध्ये डांबून ठेवले.
 Surendra Agarwal
Surendra AgarwalSarkarnama

Hit and Run Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये रोज नवनवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी आज (शनिवारी) अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल याला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातानंतर गाडी आपणच चालवत होतो, असा जबाब देण्यासाठी ड्रायव्हरला धमकवून डाबून ठेवण्यात आलं असा आरोप अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल Surendra Agarwal याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलिस स्टेशनमधून ड्रायव्हरला सोडले असता सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला जबरदस्तीने आपल्या घरी नेले. मोबाईल काढून घेतला आणि त्याला एका खोलीमध्ये डांबून ठेवले. कोणाशी बोलायचे नाही, कुठेही जायचं नाही आणि आम्ही सांगू तसच स्टेटमेंट पोलिसांना द्यायचं, असा दबाव अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरवर आणला. त्यानंतर ड्रायव्हरच्या कुटुंबीयांनी त्या ठिकाणी येऊन ड्रायव्हरची सुटका केल्याच्या समोर आला आहे. सुरेंद्र Surendra Agarwal यांनी तू मागशील तेवढी रक्कम देऊ, तुला हवं ते देऊ असे देखील अमिष ड्रायव्हरला दाखवलं असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Surendra Agarwal
Porsche Hit And Run Case : 'माझा बाप बिल्डर असता तर ', 'माझी आवडती कार', यावर निबंध स्पर्धेचे आयोजन !

'त्या' दिवशी सुरेंद्र अगरवाल दिल्लीत

आज (शनिवारी) आरोपीला कोर्टात हजर केला असता. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अपघात झाला त्या दिवशी सुरेंद्र अगरवाल हे दिल्ली येथे होते. आणि ते दिल्लीत असतानाच पोलीस डिव्हीआर घेऊन गेले असा दावा केला आहे. तसेच ड्रायव्हर घाबरला असल्याने स्वतःहून त्याने एक दिवस त्या ठिकाणी राहण्याची विनंती केली. त्याला सांगून ठेवण्यात आलं नसल्याचं देखील आरोपीच्या वकिलांनी सांगितला आहे. तसेच आरोपीचे वय 70 हून अधिक असून त्यांना विविध आजार असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला.

चार गुन्हे दाखल

पोलिसांकडून Police यावेळी आरोपीच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये छेडछाड करण्यात आल्याचे कोर्टात सांगण्यात आले. आरोपीकडून मिळालेल्या मोबाईलचा डेटा वाचायचा असल्याचा देखील पोलिसांनी सांगितलं. सुरेंद्र अगरवाल यांच्यावर कोंढवा, महाबळेश्वर आणि बंडगार्डन परिसरात 4 गुन्हे दाखल आहेत. तसेच ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला गुन्हा घेण्यासाठी दबाव टाकल्याचे देखील पोलिसांनी कोर्टात सांगितले आणि सात दिवसाची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

 Surendra Agarwal
Ashish Shelar News : 'उद्धव ठाकरे लंडनला का लपून बसले?' , आशिष शेलारांनी डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com