Pune News: काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेने( ठाकरे गट)कडून धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन उद्योगपती गौतम अदानींविरोधात विराट मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अदानींवर सडकून टीका करताना भाजप- शिंदेंगटालाही फैलावर घेतले होते. तसेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीतील काही पक्षाकडूनही अदानींना नेहमीच टार्गेट करण्यात येते. पण आता याच अदानींचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानले आहेत.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबेटिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पवारांनी थेट उद्योगपती गौतम अदानींचे आभार मानले. पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेमार्फत जगातलं पहिलं नव टेक्नॉलॉजी सेंटरची निर्मिती करत आहोत.त्याला 25 कोटी रुपयांची मदत आवश्यक होती. पण या सेंटरसाठी गौतम अदानी (Gautam Adani) यांनी 25 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यांचं नाव या ठिकाणी घ्यायला हवे असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला फिनॉलेक्स कंपनीचे दीपक छाब्रियाही उपस्थित होते.
पवार म्हणाले,आपल्या देशात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात आहे.अनेकदा भारताला युवकांचा देश म्हणून संबोधले जाते.या सगळ्या शक्तीचा उपयोग आपल्याला करता यायला हवा.प्रत्येक बदल हा नवीन काहीतरी शिकवत असतो असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात शरद पवारांनी शेतीवरही भाष्य केले.ते म्हणाले,या भागात उसाची शेती जास्त आहे.उसाची साखर बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते जगात झपाटयाने बदलत आहे. असे तंत्रज्ञान इथं आणता येईल का याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जगात जे नवं आहे ते सगळं आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं शरद पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंडेनबर्ग रिपोर्टवरून गौतम अदानींवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीवरही बौट ठेवले होते. त्यामुळेच देशातल्या कोणत्याही प्रकल्पाचं कंत्राट अदानींना दिलं जातं असा आरोपही त्यांनी केला होता. याचवेळी त्यांनी हिंडेनबर्ग प्रकरणात प्रथमदर्शनी अदानी दोषी वाटतायेत.त्यांची जेपीसीद्वारे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी वारंवार केली.
पण दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) हे उद्योगपती गौतम अदानींच्या बचावासाठी समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हिंडेनबर्ग प्रकरणावेळीही अदानी यांची बाजू घेत घेऊन चौकशीची गरज नसल्याचं मत व्यक्त केले होते. आणि देशाच्या विकासात अदानी यांचं मोठं योगदान असल्याची भूमिकाही घेतली होती.यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.