Pune Political News : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील क्राईम रेटची आकडेवारी नुकतीच सभागृहात जाहीर केली आहे. त्यातून नागपूरमधील गुन्हेगारी कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पण सध्या सुप्रिया सुळे यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत, अशी टीका करत मुरलीधर मोहळ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले.
राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतरच नागपूर क्राईम कॅपिटल होत असल्याची टीका केली होती. याला भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाच्या कारभारावरती सडकून टीका केली होती.
सुळे म्हणाल्या, यापूर्वीही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हा नागपूरचा क्राईम रेट वाढला होता. आता पुन्हा फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर नागपूर हे क्राईम कॅपिटल झाले आहे. पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून ड्रग्सच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा देखील दरम्यानच्या काळात झाला आहे. असे सांगत फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच क्राईम का वाढतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आंदोलनावरूनही सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. मोठ्या कालावधीसाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. मात्र या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अथवा मराठा समाजाचे समस्या दूर करण्याबाबत काहीच केले नाही.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न केले आणि ते कोर्टात टिकून दाखवले. त्यामुळे आपण काही केले नाही आणि जे करताहेत त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणे हे जनतेला पटणार नाही. सध्या सुप्रिया सुळे यांची अस्तित्वाची लढाई सुरू असून यातूनच त्या फडणवीस यांच्या वर टीका करत असल्याचे मोहोळ म्हणाले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.