Pune MLC election : पुण्यातील भाजप नेत्यांचं स्वप्न धुळीस, जागा राष्ट्रवादीला सुटल्यात जमा; शिवसेनेकडून नाशिक किंवा संभाजीनगर जाणार : CM फडणवीसांचे संकेत

MahaYuti seat sharing News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जागा वाटपाबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचे समोर आले आहे.
Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
DCM Sunetra Pawar, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या पाहायला मिळत आहे. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला कुठली जागा मिळणार याबाबत अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जागा वाटपाबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या संकेतानंतर पुण्यातील जागा ही राष्ट्रवादीला जवळपास सुटली असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यापूर्वी मंगळवारी पुण्यातील भाजप आमदारांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आले होते. कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा ही भाजपला सुटली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली होती. परंतु सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील भाजप इच्छुकांचे स्वप्न जवळपास धुळीत मिळाले असल्याचं दिसून येत आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

दिल्लीमध्ये बुधवारी विधान परिषदेच्या जागांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना विचारणा केली असता आपण युतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यासह तीन जागांची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, 'आमचे जागावाटप जवळपास ठरले आहे. फक्त नाशिक आणि संभाजीनगर पैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहीजे याबाबत शिवसेनेसोबत बोलणं सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याची जागा मागितली आहे. या दोनच गोष्टींवर आमचे अडला असून काही कठीण राहिलेले नाही. कठीण पेपर संपला असून आता टिक मार्क बाकी आहे, असे फडणवीस म्हणाले.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Parbhani-Hingoli MLC Election : मीच उमेदवार अन् मीच शिफारसदार; जिल्हाध्यक्ष भुमरेंचा पहिला नंबर! विधानपरिषदेसाठी 'या' पाच इच्छुकांची यादी सीएम फडणवीसांकडे सोपवली

फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी इच्छुकांमध्ये मात्र उत्साह पाहिला मिळत आहे. असे असले तरी अद्यापही उमेदवारी शहरी भागाला मिळणार की ग्रामीण भागाला मिळणार याचा तिढा सुटलेला नाही. त्यासोबतच उमेदवारी शहरी भागाला द्यायचे निश्चित झाल्यास ती पुणे शहराला मिळणार की पिंपरी चिंचवडला यावरून देखील राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
MLC election 2026 : राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा सस्पेन्स आज संपणार! सुनेत्रा पवारांच्या दरबारी खलबतं! एका जागेसाठी 'ही' चार नावे आघाडीवर

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग येणार असून या घडामोडींचे केंद्र खासदार पार्थ पवार असतील असे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उमेदवारीबाबत अंतिम निर्णय हे पार्थ पवारच घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
VidhanParishd Election: विधानपरिषदेचा धुराळा : परभणी-हिंगोलीतील 'स्थानिक'च्या गणितात राष्ट्रवादी वरचढ; एकनाथ शिंदेंपुढे जागा टिकवण्याचे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com