Pune News: पुण्यात खळबळ; भाजपच्या युवा नेत्याची रेल्वेखाली आत्महत्या

BJP Leader Sunil Dhumal News : भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्कप्रमुख म्हणून सुनील धुमाळ कार्यरत होते.
Sunil Dhumal
Sunil Dhumal Sarkarnama

Pune News: पुणे भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्कप्रमुख सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सुनील धुमाळ यांनी हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या घटनेचा तपास रेल्वे मार्ग पोलिस (Police) करत आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची अकस्मात नोंद केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धुमाळ हे आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होते. त्यानंतर ते भाजपमध्ये (BJP) युवा मोर्चा प्रदेश संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. एक सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची भाजपमध्ये ओळख होती. मात्र, त्यांनी टोकाचे पाऊल उचलत रेल्वेखाली आयुष्य का संपवले ? हे अजून कळले नाही. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Sunil Dhumal
Ravindra Dhangekar Sasoon News : ड्रग तस्कर ललितला संरक्षण देणाऱ्या 'त्या' मंत्र्यांवर कारवाई करा; धंगेकरांची मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com