Pune Politics: महायुतीत 'लेटर वॉर'; टिंगरेंच्या पत्रानंतर भाजपा संतापली, घाटेंनी सुनेत्रा पवारांच्या कानावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा 'अहंकार' घातला

PMC Mahayuti letter war: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपवर आरोप केल्यानंतर, आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. घाटेंनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तनावर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.
Dheeraj Ghate Sunetra Pawar Sunil Tingre Devendra Fadnavis .jpg
Dheeraj Ghate Sunetra Pawar Sunil Tingre Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत राजकीय संघर्ष आता थेट राज्य नेतृत्वाच्या दरबारात पोहोचला असून महायुतीतील ‘लेटर वॉर’ अधिकच पेटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपवर आरोप केल्यानंतर, आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. घाटेंनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तनावर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.

नेमकं काय आहे पत्रात...?

पुणे पालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीचा धर्म पाळून राष्ट्रवादीला योग्य ते प्रतिनिधित्व आणि निधी उपलब्ध करून दिल्याचे घाटेंनी पत्रात नमूद केले. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून मित्रपक्षावरच सातत्याने चिखलफेक केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेत काळ्या फिती बांधून केलेला निषेध, विकासकामांच्या प्रस्तावांना दिलेला विरोध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘तिरंगा यात्रे’वर महापौर मंजूषा नागपुरे यांच्याबाबत केलेली वादग्रस्त विधाने आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीच्या चौकशीची केलेली मागणी; यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे धीरज घाटे यांनी पत्रात म्हटले आहे.

Dheeraj Ghate Sunetra Pawar Sunil Tingre Devendra Fadnavis .jpg
Rahul Gandhi news : राहुल गांधींची जीवापाड मेहनत, पण बहीण प्रियांका गांधींसह पक्षातील प्रमुख नेत्यांचीच मिळेना 'सोशल' साथ; धक्कादायक वास्तव समोर...

तसेच स्वपक्षाच्या सदस्यांना समज देण्याऐवजी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे भाजपवरच चुकीचे आरोप करत आहेत. टिंगरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. केवळ भाजपनेच महायुतीचा धर्म पाळायचा आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधाची भूमिका घ्यायची, हे योग्य नसल्याचं धीरज घाटे यांनी म्हटले आहे.

राज्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात सरकार उत्तम काम करत आहे. मात्र, पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक या समन्वयाला बाधा आणत आहेत. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपल्या वर्तनात सुधारणा करावी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर होणारी अहंकारी टीका थांबवावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या शहराध्यक्षांना व नगरसेवकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती घाटेंनी केली आहे.

Dheeraj Ghate Sunetra Pawar Sunil Tingre Devendra Fadnavis .jpg
Jantar-Mantar Protest: जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगीपूर्वी आता 'फंडिंग'ची होणार चौकशी; दिल्ली पोलिसांची नवी नियमावली; कठोर नियम ऐकून बसेल धक्का

पत्राच्या प्रती वरिष्ठ नेत्यांना पाठवल्या...

धीरज घाटे यांनी या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठवल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या निधी कपातीवरून सुरू झालेला हा वाद आता शहराध्यक्ष विरुद्ध शहराध्यक्ष असा रंगू लागला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील वरिष्ठ नेते या 'लेटर वॉर'वर काय तोडगा काढतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com