Pune Crime: कापूरहोळ येथे उद्योजकाच्या मुलाचं अपहरण,सिनेस्टाईल पाठलाग अन् सुटका, अपहरणकर्ते फरार

Pune News: उद्योजक लखनशेठ दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय 18) हा मंगळवारी ( ता.3) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कापूरहोळ येथील हॉटेलवरुन त्यांच्या दिवळे गावाजवळील बंगल्यावर जेवण्यासाठी चालला असताना अचानक एक काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी त्यास जबरदस्तीने गाडीत बसवून पळवले. ती कार कापूरहोळ येथून सातारा दिशेने गेली.
Pune City Crime
Pune City CrimeSarkarnama
Published on
Updated on

Pune News: कापूरहोळ येथील आनंद उद्योग समूहाचे लखनशेठ दळवी यांच्या अठरा वर्षीय मुलाचे कारमध्ये अपहरण करुन पळून जाणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिस यंत्रणा व ग्रामसुरक्षा यंत्रणांनी सिनेस्टाईल नाकाबंदी करुन अवघ्या एक तासात मुलाला हस्तगत केले. मात्र, यावेळी अपहरणात वापरलेली कार सोडून अपहरणकर्त्यांनी पलायन केले. त्यांचा तपास राजगड पोलिस व जिल्हा गुन्हेशाखा करत आहेत.

उद्योजक लखनशेठ दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय 18) हा मंगळवारी ( ता.3) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कापूरहोळ येथील हॉटेलवरुन त्यांच्या दिवळे गावाजवळील बंगल्यावर जेवण्यासाठी चालला असताना अचानक एक काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी त्यास जबरदस्तीने गाडीत बसवून पळवले. ती कार कापूरहोळ येथून सातारा दिशेने गेली.

यावेळी त्याचे वडील लखनशेठ दळवी यांनी आरडाओरड करुन कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार वेगात निघुन गेली यावर वडिलांनी शिरवळ येथील पोलिस ठाण्यात संपर्क करत माहीती दिली तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या (18002703600) या क्रमांकावर संदेश वितरीत केला. यामुळे पुणेसह सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व ग्रामविकास यंत्रणा यांना माहीती मिळुन पोलिस व ग्रामस्थांकडुन नाकेबंदी सुरु झाली.

कापूरहोळ येथुन निघालेली अपहरणकर्त्यांची कार सारोळा-वीर-मांडकी (ता.पुरंदर) येथून मुलाला घेऊन जात असताना मांडकी गावामध्ये जेजुरी पोलिस व ग्रामसुरक्षा दलाचे ग्रामस्थांनी मांडकी येथे केलेली नाकाबंदी पाऊन गाडी अलीकडेच थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी रस्त्याच्याकडेला जाऊन ऊसाच्या शेतात गेली.

Pune City Crime
Nitish Kumar News : नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; चक्रं फिरली, लेकाबाबत काही तासांतच अधिकृत घोषणा

हे पाहताच गाडीमधील अपहरणकर्त्यांनी गाडीसह अपहरण केलेल्या पृथ्वीराज दळवी यास तिथेच सोडून पलायन केले. तेथून पोलिसांनी (एमएच.12. एक्स ई 5353) क्रमांकाची काळ्या रंगाची एक्सयुव्ही कार ताब्यात घेतली आहे.

राजगड पोलिसांसह कुटुंबीयाने तातडीने मांडकी येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले आहे.मुलाचे वडील लखनशेठ दळवी यांनी अपहरणकर्त्यां विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन जिल्हा गुन्हेशाखा व राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Pune City Crime
Pune PMC: पुणे पालिकेच्या 2 कोटींच्या भांडार खरेदी प्रकरणी मोठी अपडेट; 20 अधिकाऱ्यांना नोटीस, 8 अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरीकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 व 9822112281 यावर फोन करुन माहिती दिल्यास या आवाज परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना फोन कॉलव्दारे ऐकवला जातो. त्यामुळे सर्वजण सतर्क होऊन मदतीसाठी तत्पर होतात व गुन्ह्याला आळा घालणे शक्य होते.

या गुन्ह्यात देखील या यंत्रणेव्दारे संदेश सर्वत्र गेल्याने पोलिसांना ग्रामस्थांची मदत झाली अशी माहिती नियंत्रण कक्ष, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com