MLC Election : पुण्याच्या विधानपरिषदेच्या आमदारकीवर भाजपचा दावा; संख्याबळही दाखवलं : उमेदवारीसाठी बड्या नेत्याचे प्रयत्न

MLC Election : पुणे विधानपरिषद जागेवरून महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप नेते गणेश बिडकर यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Pune BJP leader Ganesh Bidkar has started lobbying for candidature as BJP and NCP clash over the Pune Legislative Council seat.
Pune BJP leader Ganesh Bidkar has started lobbying for candidature as BJP and NCP clash over the Pune Legislative Council seat.Sakarnama
Published on
Updated on

विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या २५ मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. अशात महायुतीतीलच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुण्याच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गतवेळी या जागेवरून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता. पण यंदा ही जागा भाजपनेच लढवावी, असा आग्रह पुण्यातील भाजप नेत्यांनी धरला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेची पुणे स्थानिक स्वराज्य संस्था जागा भाजपच्या वाट्याला यावी, यासाठी एकमताने मागणी करण्यात आली. गणेश बिडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येची आकडेवारी मांडत पुणे जिल्ह्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांची ताकद आहे, असा अहवाल, बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा पारंपरिक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडे २९८ सदस्यांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. पण भाजपचे स्वतःचेच निवडून आलेले ३०९ सदस्य आहे. शिवाय दौंडमधील ‘नागरी हित संरक्षण मंडळ’चे १७ आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्यही भाजपसोबत आहेत. त्यामुळे भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून ३३३ मतांची ताकद असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Pune BJP leader Ganesh Bidkar has started lobbying for candidature as BJP and NCP clash over the Pune Legislative Council seat.
Nashik MLC Election : नाशिकची जागा भाजपला सुटावी म्हणून इच्छुकांची धडपड, मंत्री गिरीश महाजनांचा कौल ठरणार महत्वाचा

शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्याच्या जागेवर चर्चा केली. स्थानिक नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादीकडेच कायम ठेवण्याची मागणी केली. मात्र भाजपने स्वतःचे ३०९ सदस्य आणि मित्र आघाड्यांची साथ दाखवत पुण्याच्या जागेवर दावा अधिक मजबूत केला आहे. भाजपकडून मांडल्या जाणाऱ्या ३३३ सदस्यांच्या गणितामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com