

Pune News : पुणे महापालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची आज निवड होणार आहे. मात्र, केवळ आठ जणांनाच नगरसेवक होण्याची संधी आहे. कारण दोन जणांचे कागदपत्रे अर्धवट असल्याने त्यांचा अर्ज बाद होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. महाापिलका प्रशासनाने याविषयी अधिकृत माहिती मात्र अद्याप दिलेली नाही.
महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. सर्वाधिक सात भाजपचे स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन आणि काँग्रेस कडून एक असे तब्बल दहा जणांना स्वीकृती नगरसेवक म्हणून निवडला जाणार आहे.
भाजपकडून प्रियंका शेंडगे, जयप्रकाश पुरोहित, रवी साळवेकर,विश्वास ननावरे, उदय लेले, राजेंद्र काकडे, नीलेश कोंढाळकर यांना संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काॅग्रेस कडून दत्तात्रय धनकवडे आणि राकेश कामठे मैदानात आहे. काँग्रेस मधील एकमेव जागेसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
या उमेदवारांमधून दोन दोन उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने ते छाननीत बाद झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, आज मुख्यसभेत 10 नगरसेवकांची निवड न होता फक्त 8 जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या छाननीसाठी एक वेगळी समिती स्थापन केली होती. या समितीकडून करण्यात आलेल्या छाननी दरम्यान दोन जणांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळला आहे.त्यामुळे आता हे दोन उमेदवार नेमके कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.