Pune News: बदलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमुळं पुणेकरांमध्ये प्रचंड नाराजी! पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर; आता आंदोलन पवित्रा

Pune News: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची आणि प्रभागांची पुनर्रचना केली आहे.
BJP vs NCP PMC
BJP vs NCP PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची आणि प्रभागांची पुनर्रचना केली आहे. परंतु, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयांना प्रभाग जोडल्याने पाणी, सांडपाणी वाहिन्या, कचरा, पथदिवे यांसह अन्य पायाभूत सुविधांचे प्रश्‍न गंभीर होणार आहेत. वर्षानुवर्षे एकाच क्षेत्रीय कार्यालयात असलेला भाग दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाला जोडल्याने तेथील पुढचे एक-दोन वर्षे अधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

BJP vs NCP PMC
ZP Election: परभणी झेडपीत भाजपाची मोठी खेळी! अध्यक्षपदासाठी महायुतीतील एका पक्षाला देणार डच्चू

क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेत झालेल्या बदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन देऊन बदल रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, भाजपच्याही नगरसेवकांनी चुकीच्या बदलांना विरोध केला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत छोट्या गल्ल्यांमधील सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्या यांची माहिती कार्यालयातील अभियंते, कर्मचाऱ्यांना असते, नागरिकही थेट याबाबत तक्रार करतात. जलवाहिनी कोणत्या भागातून कशी गेली, हे प्रशासनाला माहिती आहे. मात्र, आता क्षेत्रीय कार्यालयच बदलल्याने अधिकाऱ्यांचीही समस्या सोडवताना तारेवरची कसरत होणार आहे. याचा फटका प्रभाग क्रमांक २, ४, ५, २९, २२, ३९ यांना सर्वाधिक बसणार आहे.

BJP vs NCP PMC
निवृत्त जवान अन् अग्निवारांना आता रेल्वे खात्यात मिळणार नोकरी; सरकारची विशेष योजना

क्षेत्रीय कार्यालयाची हद्द मोठी केल्याने प्रभाग क्रमांक २९ मधील राजाराम पूल परिसरातील नागरिकांना स्वप्नशिल्प सोसायटी येथील वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाऐवजी घोले रस्त्याला यावे लागणार आहे. हीच स्थिती प्रभाग क्रमांक ३९ ची आहे. या प्रभागाला बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय सोयीचे असताना हा भाग कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाला जोडला आहे. विशेष म्हणजे कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय हे प्रभाग क्रमांक ३८ मध्ये असून, ३८ प्रभाग धनकवडी-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाला जोडला आहे.

BJP vs NCP PMC
Iran Attack: भारतीय विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! इराण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगोनं जाहीर केली नवी अ‍ॅडव्हाजरी

सिंहगड क्षेत्रीय कार्यालयावर ताण

सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक २८, ३३, ३४ आणि ३५ समाविष्ट केले आहे. दांडेकर पुलापासून संपूर्ण सिंहगड रस्ता, खडकवासला, नऱ्हे, उत्तमनगर, शिवणे, किरकटवाडी, सणसनगर, नांदोशी, धायरी असा समाविष्ट गावांचा भाग जोडला आहे. या भागात पायाभूत सुविधांचा पूर्वीच बोजवारा उडालेला असताना भौगोलिक हद्द मोठी केली आहे. येथे काम करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाला अधिक मनुष्यबळ, जास्त निधीची गरज पडणार आहे.

राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

क्षेत्रीय कार्यालयाच्या बदलाचा सर्वाधिक फटका वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील येरवडा, कळस, वाघोली, विश्रांतवाडी या भागातील नागरिकांना बसला आहे. या बदलामुळे वाघोलीतील नागरिकांना १२ किलोमीटर लांब प्रवास करून येरवडा क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. बोपखेलच्या नागरिकाला दोन किलोमीटरऐवजी आठ किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, भाजपच्या दबावाला बळी पडून ही चूक सुधारली नाही तर, याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत दिला. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश साळवे यांनीही यास विरोध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com