Iran Attack: भारतीय विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! इराण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगोनं जाहीर केली नवी अ‍ॅडव्हाजरी

Iran Attack: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्राईल यांच्यातला संघर्ष भडकला असून इराणनं या दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
Indigo Advisary_Iran Attack
Indigo Advisary_Iran Attack
Published on
Updated on

Iran Attack: इराणविरोधात असलेल्या ताणावाच्या वातावरणात अखेर अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाई करत इराणवर बॉम्ब हल्ले सुरु केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील दुबईसह इतर खाडी देशांमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले केले. त्यामुळं युद्ध भडकलं असून त्याचा परिणाम या भागातून जाणाऱ्या इतर देशांच्या विमानसेवांना बसणार आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपनी इंडिगोनं नवी नियमावली जाहीर केली आहे. भारतीय प्रवाशांनी काय काळजी घ्यावी हे यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Indigo Advisary_Iran Attack
Zilla Parishad Election : सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रासाठी मोठी अपडेट; नाशिक, बीड, नागपूरसह 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीतच?

इंडिगोच्या अ‍ॅडव्हायझरीत काय?

  • इराण आणि मध्य पूर्वेतील हवाई निर्बंधांमुळं मध्य पूर्वेकडे जाणारी आणि येथून येणारी सर्व उड्डाणे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

  • आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने हे उपाय करण्यात आले आहेत.

  • आमचे पथक सतत बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि शक्य तितके व्यत्यय कमी करण्यासाठी ऑपरेशन्स रिकॅलिब्रेट करत आहेत.

  • ग्राहकांना प्रस्थान करण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

  • कोणताही बदल झाल्यास नोंदणीकृत मोबाईल व ई-मेलवर तात्काळ माहिती देण्यात येईल असंही कंपनीनं म्हटलं आहे.

  • जर तुमच्या फ्लाइटवर परिणाम झाला असेल, तर पर्यायी प्रवास पर्याय शोधण्यासाठी किंवा पूर्ण परतफेड निवडण्यासाठी कृपया https://t.co/9VuwyhxE9G ला भेट द्या.

  • या काळात तुम्हाला आमचं निश्चितच सहकार्य असणार आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.

नेमकी घडामोड काय?

इराणविरोधात असलेल्या ताणावाच्या वातावरणात अखेर अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाई करत इराणवर बॉम्ब हल्ले सुरु केले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये खामेनेईच्या कार्यालयांजवळ एक हल्ला करण्यात आला. इस्रायलनं एकाच वेळी इराणच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यानंतर इराणनं प्रत्युत्तर देताना दुबईसह मध्यपुर्वेतील इतर खाडी देशांमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले केले आहेत. त्यामुळं आता युद्ध चांगलंच भडकलं आहे. आता इराणनंही दिलेल्या प्रत्युत्तरामुळं अमेरिका आणि इस्राइल मिळून इराणवर मोठा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं संपूर्ण जगालाच याची झळ बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com