PMC Election 2025: प्रभाग रचनेवर साडेपाच हजार हरकती; तीन प्रभागात कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली

Pune ward formation 2025 News: सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी सुनावणी घेणे बंधनकारक आहे.पुणे महापालिकेतर्फे त्याचे वेळापत्रक व ठिकाण निश्‍चित झालेले नाही.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ५,४९६ हरकती नोंदविल्या गेल्या असून काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तर काहींमध्ये शून्य हरकती आल्या आहेत.

  2. धनकवडी-सहकारनगर (१,८९९) आणि नगररस्ता-वडगावशेरी (१,२६८) या भागातून सर्वाधिक हरकती आल्या, तर शनिवार पेठ, डेक्कन जिमखाना आणि कर्वेनगर या प्रभागांत एकही हरकत आलेली नाही.

  3. शासनाने नियुक्त अधिकाऱ्यांकडून ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार असून त्याचे वेळापत्रक महापालिका जाहीर करणार आहे.

Pune News:पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. शेवटच्या दिवशी काल (गुरुवारी) सुमारे 2 हजार 899 हरकती, सूचना आल्या आहेत. निवडणूक शाखेकडे आलेल्या या हरकतींचा एकूण आकडा 5 हजार 496 एवढा झाला आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत हरकती, सूचनांची दखल घेण्यात येत होती.

Pune Municipal Corporation
Congress News: काँग्रेस पुनरुज्जीवनाची बिहारमध्ये संधी; मतपेढी कोणती?

सर्वाधिक हरकती

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातून सर्वात कमी प्रत्येकी ९ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमधून धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक १ हजार ८९९, नगररस्ता-वडगावशेरी येथून १ हजार २६८ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगावमध्ये ८१९, प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक-साडेसतरानळी येथून ५५८ आणि प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक येथून २ हजार ६६ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

Pune Municipal Corporation
Dattatraya Bharane: कॅबिनेट सोडून भुजबळ का गेले? दत्ता भरणेंनी सांगितलं कारण..

शून्य हरकती

तीन प्रभागांमध्ये शून्य हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना- हॅपी कॉलनी, प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी या तीन प्रभागात एकही हरकत आलेली नाही. तर याच शेजारील प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी-कोथरूड या प्रभागातून केवळ एक हरकत आली आहे.

या हरकती आणि सूचनांवर लवकरत सुनावणी होणार आहे. त्यांचे वेळापत्रक महापालिकेला जाहीर करावे लागणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी सुनावणी घेणे बंधनकारक आहे.पुणे महापालिकेतर्फे त्याचे वेळापत्रक व ठिकाण निश्‍चित झालेले नाही.

Pune Municipal Corporation
Manoj Jarange: जरांगेंच्या मागणीवरून कुणबी प्रमाणपत्र कसे काय देता? ओबीसी संघटना एकवटल्या; घेतला मोठा निर्णय

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली, त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली. प्रभाग रचनेवर राजकीय कार्यकर्त्यांचे अनेक आक्षेप आहेत. ही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाली आहे असे त्यांना वाटत होत्या. पण हरकती नोंदविण्याचे प्रमाण अगदी नगण्य असल्याने याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. प्रभाग तयार करताना प्रमुख रस्ते, उड्डाणपूल, नदी, नाले या नैसर्गिक हद्दी ओलांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याविरोधात हरकती नोंदविल्या आहेत.

Pune Municipal Corporation
Thackeray Brothers Defeat: छोट्या निवडणुकीतून ठाकरेंना मोठा इशारा; भाजप-शिंदेंना दिलासा

FAQs

Q1. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर किती हरकती आल्या आहेत?
👉 एकूण ५,४९६ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.

Q2. सर्वाधिक हरकती कोणत्या भागातून आल्या?
👉 धनकवडी-सहकारनगर (१,८९९) आणि नगररस्ता-वडगावशेरी (१,२६८) येथून.

Q3. कोणत्या प्रभागांमध्ये एकही हरकत आलेली नाही?
👉 शनिवार पेठ, डेक्कन जिमखाना आणि कर्वेनगर प्रभागांत.

Q4. या हरकतींवर सुनावणी कधी होणार आहे?
👉 ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com