Mamata Banerjee: पोटनिवडणुकीपूर्वी TMCमध्ये खिंडार; ममता बॅनर्जींना धक्का, 100 हून अधिक नेते काँग्रेसमध्ये

Mamata Banerjee Faces Major Setback: तृणमूल काँग्रेसच्या १०० नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ६ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
Mamata Banerjee Faces Major Setback
Mamata Banerjee Faces Major SetbackSarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मालदा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षातील १०० हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महिषबथानी परिसरातील बलरामपूर येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे यामध्ये १३ पंचायत सदस्य, एका पंचायत समिती सदस्यासह तृणमूलच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

या पक्षप्रवेशामुळे मालद्यात काँग्रेसने पुन्हा संघटनात्मक ताकद उभी करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसचे क्षेत्रीय अध्यक्ष, ब्लॉक उपाध्यक्ष आणि १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. याशिवाय कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

मालदा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ईशा खान चौधरी आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी आमदार भूपेंद्रनाथ हलदर यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काँग्रेस समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. मानिकचकचे माजी आमदार मोत्तकिम आलम, मालदा ब्लॉकचे माजी काँग्रेस अध्यक्ष गोपाल सरकार आणि स्थानिक काँग्रेस नेते उदय मंडल यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Mamata Banerjee Faces Major Setback
Shalarth ID Scam: हजारहून अधिक शिक्षकांची भरती, पण एकही मूळ फाइल नाही! हायकोर्टानं शिक्षण विभागाला झाप झाप झापलं

महिषबथानी परिसराला काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव असलेला भाग मानले जात होते. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचा विस्तार झाल्यानंतर या भागातील राजकीय समीकरणे बदलली. आता मोठ्या संख्येने तृणमूलचे स्थानिक पदाधिकारी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने जुन्या राजकीय प्रभावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Mamata Banerjee Faces Major Setback
Maharashtra Drought 2026: दुष्काळ जाहीर, आता मदत कधी? पंचनामा ते GPS सर्वेक्षण; GR मध्ये सगळं स्पष्ट

पश्चिम बंगालमध्ये दोन विधानसभा मतदारसंघांसाठी ६ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार असून ९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मालद्यातील पक्षांतराला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. तृणमूल काँग्रेसने राजनगर मतदारसंघातून रबीउल आलम चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, हुमायून कबीर यांचा मुलगा राजनगरमधून निवडणूक लढवत आहे.

या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीच्या आधीच मालद्यात काँग्रेसच्या संघटनेत झालेली वाढ तृणमूलसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. माजी आमदार भूपेंद्रनाथ हलदर यांनीही या पक्षप्रवेशाची माहिती आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून दिली असून, कार्यक्रमातील छायाचित्रे शेअर केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com