Pune Crime: पुणे पोलिसांचं मोठं यश; ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलाग, विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Pune Hooch Tragedy: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे
Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात घडलेल्या विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी थरारकरित्या पाठलाग करून अटक केली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे

सध्या ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठीत आहेत. तर, या रॅकेटमध्ये आणखी सुमारे 20 जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार 26 ते 28 मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता. तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाती मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ऊरळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच ऊरळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार, पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून त्याचा गुप्त पद्धतीने शोध घेत होते.

Pune Police
Dharashiv News : धाराशिवमध्ये मध्यरात्री फिरली सूत्रं! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नाट्यमय घडामोडीनंतर भाजपची 'फिल्डिंग' उधळत 4 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

अन्य आरोपींचा शोध घेतला जाणार

या गुन्ह्यात आर्यन संजीव धोत्रे (वय 24) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय 29) यांना मंगळवारी (ता.25) अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बाळू लोंढे याची या गुन्ह्यातील भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच या गुन्ह्याची संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Police
Mumbai Protest Guidelines: मुंबई गाठण्याआधीच सरकारची नियमावली; संतापलेले जरांगे म्हणाले, 'आम्ही तुमची रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही...'

ओळख लपविण्यासाठी बदलला पेहराव

पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू लोंढे हा फरार काळात आपला पेहराव बदलला होता. नेहमी दाढी-मिश्या वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी मिशा काढून अन् मळकट कपडे घालून वावरत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com