परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या घरात सापडलं मोठं घबाड

टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
Tukaram Supe 

Tukaram Supe 

Sarkarnama 

Published on
Updated on

पुणे : पेपरफुटी प्रकरणात (Maharashtra Government examination paper leak case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी आता कंबर कसली असून ठिकठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या छापेमारीत पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.

तुकाराम सुपे यांना अटक केली त्यावेळी त्यांच्याकडील 90 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त केले होते. आता त्यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तब्बल दोन कोटी रुपयांचं घबाड सापडलं आहे. पोलिसांना सुमारे दीड कोटी रुपये रक्कम व सोन्याचे दागिने सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घरावर छापा टाकण्याआधीच सुपे यांची पत्नी व मुलाने ही रक्कम दुसरीकडे लपवली होती.

<div class="paragraphs"><p>Tukaram Supe&nbsp;</p></div>
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा राणेंना विसर अन् थेट मागितले 13 आमदार...

पुणे पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्याचा उलगडा झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. पोलिसांना या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. यामध्ये आणखी रक्कम हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सुपे यांच्या गावाकडील घरावरही छापा टाकला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकठिकाणी असलेल्या मालमत्ताही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Tukaram Supe&nbsp;</p></div>
कट्टर विरोधक असलेल्या भाजप सरकारला काँग्रेसचा पाठिंबा अन् टीकेचा भडिमार

दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप सुपेंवर करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता प्रितेशकडे टीईटीच्या चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे आणि टीईटीचे 50 ओळखपत्र मिळाले होते. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. परिक्षेपासूनच विद्यार्थ्यांनी प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा आरोप करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतरही टीईटी परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात आली नाही.

त्यातच प्रितीशच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने या परीक्षेतही घोटाळा झालाय का? असा सवाल उपस्थित उपस्थित होऊ लागला आहे. याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतरच पोलिसांनी तुकाराम सुपेंना अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com