Pune Police : भारत पाकिस्तान मॅच नंतर सेलिब्रेशन करणाऱ्यांना पुणे पोलिसांची तंबी... तर गाठ आमच्याशी असेल

Pune Police warning : भारत-पाकिस्तान टी20 सामन्यापूर्वी पुणे पोलिसांनी एफसी रोडवरील जल्लोषात हुल्लडबाजी, फटाके व रस्ते अडवण्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Pune Police on alert at FC Road ahead of India vs Pakistan T20 match celebrations to prevent hooliganism and public nuisance.
Pune Police on alert at FC Road ahead of India vs Pakistan T20 match celebrations to prevent hooliganism and public nuisance.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या भारत आणि श्रीलंकेमध्ये T-20 वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू आहेत. उद्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. सुरुवातीला पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानने भारतासोबत मॅच खेळण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे या मॅच कडे सबंध क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

भारत पाकिस्तान मॅच ही नेहमीच क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी असते त्यामुळे आपला संघ विजेता झाल्यानंतर त्याचं खास सेलिब्रेशन देखील केलं जातं. खास करून पुण्यातील सेलिब्रेशन संपुर्ण देशांमध्ये चर्चेचा विषय ठरतं असतो. भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारताचा विजय झाल्यानंतर पुणेकर एफसी रोडवर येऊन आपला विजय जल्लोष साजरा करतात. फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते.

मात्र या जल्लोषाबरोबर काही प्रमाणात तरुणांकडून हुल्लडबाजी देखील होत असल्याचं गेल्या काही सेलिब्रेशन दरम्यान पाहायला मिळाला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यापूर्वीच पुणे पोलिसांनी सक्त आदेश दिले आहेत.

Pune Police on alert at FC Road ahead of India vs Pakistan T20 match celebrations to prevent hooliganism and public nuisance.
Ind Vs Pak Asia Cup: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात पेटलं राजकारण! सरकारनं थेट नियमच सांगितला

त्यानुसार भारत पाकिस्तान सामना संपल्यानंतर हुल्लडबाज चाहत्यांवर पोलिसांचा "वॉच" राहणार आहे. रस्ते अडवणे, गाडीचे सायलेन्सर वाजवून धिंगाणा करणे, रस्त्यावर फटाके फोडून नागरिकांना त्रास देणे तसेच पीएमपीएल बस वर चढून धिंगाणा घालणे. रस्त्यामध्ये गाड्या अडून डान्स केल्यास पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

Pune Police on alert at FC Road ahead of India vs Pakistan T20 match celebrations to prevent hooliganism and public nuisance.
Trump India, Pak deal violation: उतावीळ ट्रम्प यांच्यामुळे भारत-पाकमधील 'त्या' कराराचे उल्लंघन; मोदी फटकारणार का?

पोलिसांच्या (Pune Police) या कठोर आदेशानंतर उद्याच्या जल्लोषामध्ये काहीसा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या भारताचा विजय झाल्यास एफसी रोडवर होणारा आयकॉनिक सेलिब्रेशन पाहायला मिळणार का? नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com