Pune Porsche Crash Update : ससूनमधील आरोपी डॉ. हळनोर करणार होता आत्महत्या ?

Pune Porsche Accident : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी डॉ. हळनोर याच्याकडे तपास सुरू केला आहे. यामध्ये ससूनमधील वरिष्ठ डॉक्टर अजय तावरे याच्या दबावाखाली हळनोर याने ब्लड सॅम्पल बदलले असल्याची माहिती दिली आहे.
dr shrihari halnor
dr shrihari halnorSarkarnama

Pune Porsche News : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याप्रकणी अटक असलेला आरोपी डॉ. श्रीहरी हळनोर आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या डॉक्टर आरोपीकडे केलेल्या चौकशीमधून ही माहिती पुढे आली आहे. या अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉ. हळनोर याला अटक केली आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या ताब्यातील पोर्श गाडी भरधाव वेगाने चालवून हा अपघात केला होता. या अपघातानंतर या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा मुलगा गाडी चालवित नव्हता तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवित होता, असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी ड्रायव्हरला पैशाचे अमिष दाखविण्यात आले. तो ऐकत नसल्याने त्याचे अपहरण करून एका खोलीत डांबून देखील ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

dr shrihari halnor
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचेही...; धक्कादायक माहिती समोर

अल्पवयीन मुलाची ब्लड टेस्ट ससूनमध्ये करण्यात आली होती. यामध्ये संबधित मुलगा दारू प्यायला आहे की नाही, हे सिद्ध होऊ नये, यासाठी थेट त्याचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. या अल्पवयीन आरोपीसह त्याच्याबरोबर अपघाताच्या वेळी गाडीत असलेल्या इतर मुलांचे देखील ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी पोलिसांनी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर दोन डॉक्टरांसह शिपायाला अटक केली आहे. त्यांना कोर्टाने (Court) पोलिस कोठडी सुनावली आहे.

dr shrihari halnor
Porshe Accident Pune : मॅडमनी खरच काही विचारले नाही, सांगा की पुणे CP साहेब?

पोलिसांनी (Police) अटक केलेल्या आरोपी डॉ. हळनोर याच्याकडे तपास सुरू केला आहे. यामध्ये ससूनमधील वरिष्ठ डॉक्टर अजय तावरे याच्या दबावाखाली हळनोर याने ब्लड सॅम्पल बदलले असल्याची माहिती दिली आहे. झालेल्या प्रकारानंतर आपली मोठी चूक झाल्याचे डॉ. हळनोर याच्या लक्षात आल्याने त्याने ससून मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपला माफीनामा देखील लिहून दिला होता. माझी चूक झाली. माझ्यावर तावरे याचा दबाव होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या माफीनाम्यात म्हंटलं असल्याचं पोलिसांच्या तपासत पुढे आलं आहे.

dr shrihari halnor
Pune Hit And Run Case Update : कल्याणीनगर अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांचे ब्लड सॅम्पल घेणार ?

अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचे कृत्य केल्यानंतर डॉ. हळनोर हा नैराश्यामध्ये गेला होता. आपल्याकडून खूपच मोठी चूक झालेली आहे. यामुळे दोन दिवस त्याला झोप देखील येत नव्हती. झालेल्या प्रकारानंतर आत्महत्या करावी, असेही आपल्याला वाटत होते, असे पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये समोर आले आहे.

dr shrihari halnor
Porsche Car Accident : आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल घेताना 'त्या' डॉक्टरांची शक्कल; पुरावेच नष्ट करण्याचा 'मास्टर प्लॅन' उघड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com